Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून अरबाज पटेलने नुकतीच एक्झिट घेतली. जवळचा मित्र अचानक एलिमिनेट झाल्यामुळे निक्की प्रचंड भावुक झाल्याचं रविवारच्या ( २२ सप्टेंबर ) भागात पाहायला मिळालं. या आठवड्यात रितेश देशमुख कामानिमित्त परदेशात असल्याने भाऊच्या धक्क्याऐवजी घरात पत्रकार परिषद पार पडली. यानंतर दुसऱ्या दिवशी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील कलाकारांनी घरात उपस्थिती लावली होती.

घरातील पाहुणे गेल्यावर ‘बिग बॉस’ने नॉमिनेट झालेल्या पाच सदस्यांना एलिमिनेशनसाठी अ‍ॅक्टिव्हिटी रुममध्ये बोलावून घेतलं. यंदा घरात वर्षा, सूरज, जान्हवी, निक्की आणि अरबाज असे एकूण पाच सदस्य नॉमिनेट होते. यांच्यामध्ये सर्वात कमी मतं मिळाल्याने अरबाजने या आठवड्यात घराचा निरोप घेतला. ‘बिग बॉस’ने अरबाजचं एलिमिनेशन जाहीर केल्यावर निक्की ढसाढसा रडू लागली. तिने शेवटपर्यंत प्लीज ‘बिग बॉस’ अरबाजला काढून नका अशी विनंती केली मात्र, नियमांनुसार त्याला बेघर व्हावं लागलं.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “निक्कीच्या नादी लागून चुकला”, अरबाज Eliminate झाल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “त्याच्या जीवावर…”

‘बिग बॉस’च्या घरात निक्की भावुक

अरबाज बाहेर झाल्यावर निक्की कसा खेळ खेळणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर ‘कलर्स मराठी’ने आजच्या भागाची आणि अरबाज एलिमिनेट झाल्यावर निक्कीची कशी अवस्था झालीये याची झलक एका प्रोमोमधून शेअर केली आहे. निक्की यामध्ये प्रचंड बिथरल्याचं पाहायला मिळत आहे. घरातील बेडरुम एरियामध्ये ती अरबाजचं लॉकेट जवळ घेऊन रडत असते. किचनमध्ये कॉफी पिताना निक्की म्हणते, “अरबाज मी कप सुद्धा तुझ्या नावाचा घेतलाय पण, तूच नाहीये. तू का मला सोडून गेला” असं म्हणत ती प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी झाली भावुक

निक्की या प्रोमोमध्ये शेवटी मुख्य प्रवेशद्वाराकडे डोळे लावून बसल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी ती म्हणते, “मला असं वाटतंय ही राणी आता हललीये…” एकंदर पहिल्या दिवसापासून अरबाजबरोबर गेम खेळल्याने त्याचं घराबाहेर जाणं निक्कीला खूप जड गेल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – घराबाहेर आल्यावर अरबाज पटेलची पहिली पोस्ट! शेअर केले निक्कीबरोबरचे भावनिक फोटो; ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष

दरम्यान, आता निक्की घरातील अन्य सदस्यांशी कशी वागणार, आता उरलेल्या दिवसांमध्ये ती नेमकी कोणाशी मैत्री करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Story img Loader