Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यंदा पहिल्या दिवसापासून ‘ए’ व ‘बी’ असे दोन ग्रुप तयार झाले होते. परंतु, भाऊच्या धक्क्यावर रितेशने घेतलेल्या शाळेमुळे आणि निक्कीला तिच्याविषयी मागून काय-काय चुगल्या केल्या जातात याचे व्हिडीओमध्ये दाखवल्यामुळे घरातलं संपूर्ण समीकरण बदलून गेलं आहे. जान्हवी, अरबाज, वैभव, निक्की या नेहमी एकत्र असणाऱ्या चार सदस्यांच्या मैत्रीत आता फूट पडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निक्कीशी मैत्री तुटल्यामुळे अरबाज काहीसा अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाजला निक्की व अभिजीतची मैत्री आधीपासूनच खटकत होती. अशातच ‘बिग बॉस’ने जोड्यांच्या टास्कमध्ये निक्की-अभिजीतची जोडी तयार केली. यामुळे खेळाच्या नियमानुसार आता संपूर्ण आठवडा या दोघांना एकत्र पट्टा बांधून बंधनात राहावं लागणार आहे. हा टास्क सुरू झाल्यापासूनच निक्की-अरबाजमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली होती. अखेर या भांडणाचं मंगळवारच्या ( २७ ऑगस्ट ) भागात प्रेक्षकांना मोठं स्वरुप पाहायला मिळालं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – दोन दिवसांत अभिजीत सावंत बदलला…; मित्रमंडळींचा मोठा आरोप! निक्कीशी मैत्री पडली भारी, नेमकं काय घडलं?
अरबाजने किचनमध्ये भांडी फोडली. एवढ्यावर शांत न बसता बेडरुममध्ये जाऊन त्याने आदळआपट केली. याचा परिणाम म्हणून अरबाजकडून कॅप्टन्सीपदाची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. पण, या सगळ्या भांडणाचा परिणाम अरबाज-निक्कीच्या नात्यावर झाला आहे. आज दोघंही विशेषत: निक्की ढसाढसा रडत असल्याचं पाहायला मिळालं.
Bigg Boss Marathi : निक्की का रडली?
निक्की लिव्हिंग एरियामधून जाताना अभिजीतला “बाजूने चालत जाऊया…उगाच कोणाला धक्का लागला, तर मुद्दा होईल” असं सांगते. निक्कीचा हा टोमणा ऐकून अरबाज चांगलाच भडकतो. “तुला जे काही बोलायचंय ते मला थेट सांग” असं तो निक्कीला स्पष्ट सांगतो. याशिवाय पुढे, बेडरुममध्ये जाऊन तो रडू लागतो. आपल्या मित्राला रडताना पाहून निक्कीला सुद्धा वाईट वाटतं. ती धावतपळत अरबाजजवळ जाते. पण, अरबाज हात जोडून तिला “मी खूप मेहनत करून इथपर्यंत आलोय… माझ्या रागामुळे मी आता माझं कोणतंच नुकसान होईल असं वागणार नाहीये. प्लीज तुझ्यासमोर मी हात जोडतो… प्लीज निक्की मला टोमणे नको मारूस” असं सांगतो. यानंतर निक्की त्याला सॉरी बोलून निघून जाते.
हेही वाचा : “हा शो निक्की-अरबाजच्या लव्हस्टोरीचा नाही…”, पुष्कर जोग संतापला; पोस्ट शेअर करत थेट ‘बिग बॉस’ला केली विनंती
एकीकडे अरबाज भावुक होतो. तर, दुसरीकडे निक्की अरबाजसाठी अभिजीतसमोर ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं. “मला घरातले लोक त्याच्याशी बोलू देत नाहीत हा माझ्यावर अन्याय आहे. महत्त्वाचं म्हणजे तो मुलगा या सगळ्यांचं ऐकून दाबून राहतोय. कारण, तो एकटा खेळू शकत नाही. त्याच्याशी बोलायची मला प्रचंड इच्छा आहे. मी त्या मुलासाठी काय नाही केलं? मी कुठे कमी पडले? आता घरातले लोक त्याला माझ्याशी बोलू देत नाहीयेत यासाठी मी काय करू? हे सगळे लोक खूप घाण आहे. त्यांना वाटतंय मी आणि अरबाज एकत्र आलो तर त्यांचा पत्ता कट होईल. त्याला मी हवीये…पण, तो मनात सगळं दाबून ठेवतोय.” असं सांगत निक्कीने अभिजीतसमोर आपलं मन मोकळं केलं.
दरम्यान आता येत्या काळात निक्की-अरबाजची ( Bigg Boss Marathi ) मैत्री पुन्हा आधीसारखी होणार की, वाद आणखी वाढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.