Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण ६ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, आर्या जाधव, वैभव चव्हाण आणि निक्की तांबोळी या सदस्यांचा या नॉमिनेशनमध्ये सहभाग आहे. आता या सहा सदस्यांपैकी कोण घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी निक्कीने दरवेळीप्रमाणे नॉमिनेट झाल्यावर घरात हुज्जत घालण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
निक्कीचं वर्षा उसगांवकरांशी भांडण
निक्की आणि वर्षा उसगांवकरांचं आजच्या भागात ( Bigg Boss Marathi ) भाजीवरून जोरदार भांडण झाल्याचं ‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सध्या सर्व सदस्यांना शिक्षा आणि टास्क म्हणून अगदी मुबलक प्रमाणात जेवण करण्याचं साहित्य पुरवलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या सदस्यांमध्ये जेवणावरून नेहमीच भांडणं होत असतात. आता निक्की आणि वर्षा उसगांवकरांमध्ये भाजीवरून वाद झाला आहे. या दोघींची भांडणं घरातील किचन एरियामध्ये झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
निक्की म्हणते, “या घरात लोकांना अन्न मिळत नाहीये आणि तुम्ही भाज्या फेकताय सरळ…” यावर वर्षा म्हणतात, “कारण मला ती भाजी खराब वाटली” यावर निक्की “तुम्ही किती घाण स्वभावाच्या आहात ते दिसलंय आता” असं त्यांना सांगते. यावर वर्षा तिला म्हणतात, “उगाच आरडाओरडा करून काहीच सिद्ध होणार नाही”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवीच्या गळ्यात निक्कीचा फोटो, तर अरबाजकडे…; ‘बिग बॉस’च्या घरात अनोखा नॉमिनेशन टास्क; नेमकं काय घडणार, पाहा…
निक्की शेवटी रागात म्हणते, “चला बाहेर जा मग…इथे उभं राहून बोंबाबोंब करू नका” हा प्रोमो व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी निक्कीला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात सुरूवात केली आहे. “नॉमिनेट झाली की निक्की बिथरते”, “नॉमिनेशनमध्ये आल्यावर हिची फडफड सुरू होते”, “बाहेर ये आता निक्की”, “नॉमिनेट झाल्यावर हे निक्कीचं नेहमीचं आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर ( Bigg Boss Marathi ) केल्या आहेत.