Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात सहाव्या आठवड्यात नॉमिनेट झाल्यावर निक्कीचा एक वेगळाच ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यावर घरात नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निक्की कॅप्टन वर्षा यांना “मी वॉशरुम स्वच्छ करणार नाही” असं सांगते. यामागे “सूरजने निकष समजून न घेता मला नॉमिनेट केलं. तुम्ही माझ्यासाठी स्टॅण्ड घेतला नाही त्यामुळे मी घरात ड्युटी करणार नाही” असं कारण ती वर्षा यांना देते. ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उठवल्यावर निक्की घरात कोणतंही काम करणार नाही अशी भूमिका घेते. ‘वॉशरुम स्वच्छ कर’ असं आर्याने सांगून देखील निक्की काम करण्यास नकार देते. यानंतर घरातले सगळेजण तिच्याविरोधात एकत्र येतात.

निक्कीला अभिजीत देखील समजवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ती कोणाचंही ऐकून घेत नाही. यावर वर्षा म्हणतात, “नॉमिनेशन आणि ड्युटीचा संबंध नाही. तू वॉशरुम धुणार नाहीस म्हणजे…यात काहीच लॉजिक नाहीये. तुला केवळ निमित्त म्हणून हे करायचंय. तुझा लहरी स्वभाव आहे आणि आता तू खरंच कहर करतेस” या प्रकरणावर पंढरीनाथ म्हणतो, “मग आता ज्या-ज्या गोष्टी घरात येतील त्या फक्त घरातल्यांनी वापरायच्या” यानंतर निक्की पुढे, “हा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. कॅप्टनला पद सोडायला सांगा…असा कॅप्टन काय कामाचा?” असं म्हणते.

हेही वाचा : बाप-लेकाचं प्रेम! प्रसाद ओकला मुलाने गिफ्ट दिली आलिशान BMW कार; मंजिरी म्हणाली, “आज २२ वर्षांनी तू बाबाला…”

निक्कीच्या विरोधात संपूर्ण घर ( Bigg Boss Marathi ) उभं राहतं. “काम केलं नाहीस, तर घरात ज्या गोष्टी येतात त्या तुला वापरायला देणार नाही” असं तिला सगळे सदस्य सांगतात. यानंतर वर्षा घराच्या कॅप्टन असल्याने निक्की त्यांना म्हणते, “आता तुम्ही एक शब्दही का नाही बोलत? हे लोक म्हणतात रेशन देणार नाही हे योग्य आहे का? मी सगळं वापरणार कोणीही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही.”

वर्षा या भांडणांदरम्यान निक्कीला सांगतात, “तू वॉशरुम स्वच्छ केले नाहीस, तर खरं म्हणजे तिथेही तुला जाण्याचा अजिबात अधिकार नाही. तू हा बाहेरचा बाथरुम वापर…आतमध्ये तुला अधिकार नाही. हा सगळ्यांचा निर्णय आहे.”

हेही वाचा : The Buckingham Murders : लहान मुलाचा खून अन् ५ संशयित! खऱ्या आरोपीला कसं शोधणार करीना कपूर? पाहा ट्रेलर

निक्की वर्षा उसगांवकरांशी पुन्हा भांडली

वर्षा यांना उलट उत्तर देत निक्की म्हणते, “तुमच्यासमोर मी आत बाथरुममध्ये जाऊन दाखवेन. मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ…माझा बाप बनू नका. समजलं ना…? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा” निक्कीने एवढं बोलूनही वर्षा आपला संयम ढळू देत नाहीत असं एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. या प्रकरणावरून आता सगळेच निक्कीच्या विरोधात गेले आहेत. याशिवाय घरातील ( Bigg Boss Marathi ) अन्य सदस्यांनी अरबाजला देखील यावरून सुनावलं.

Bigg Boss Marathi : निक्कीवर नेटकरी भडकले

निक्कीच्या या वागणुकीवर नेटकऱ्यांसह पुष्कर जोगने तिला सुनावलं आहे. पुष्कर तिला म्हणतो, “स्पष्ट बोलायला घाबरतात लोक…अरे स्टॅण्ड घ्या. तुम्ही कोणाला घाबरताय? वर्षा उसगांवकर ताईंवर असं ओरडणं तुम्ही कसं सहन करून घेतलं. लाज वाटली पाहिजे” याशिवाय नेटकऱ्यांनी “हिला आवरा ‘बिग बॉस’ उर्मट बाई आहे”, “निक्कीला बाहेर काढा सर्वात आधी”, “निक्की फार अती करते” अशा कमेंट्स ‘कलर्स मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पोस्टवर केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi nikki huge fight with varsha ugaonker netizens slams her for bad language sva 00