Bigg Boss Marathi Nikki And Arbaz : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन तुफान सुपरहिट ठरला. यंदाच्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला असला तरीही पहिल्या दिवसापासून घरात निक्की तांबोळीची चर्चा सुरू होती. हिंदी ‘बिग बॉस’ गाजवून आलेली निक्की टास्क, भांडणं आणि विशेषत: अरबाजशी असलेली तिची मैत्री या सगळ्या गोष्टींमुळे चांगलीच चर्चेत राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस’च्या ग्रँड फिनालेमध्ये निक्कीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पाचव्या पर्वाची ती सेकंड रनर अप ठरली. सूरजच्या विजयावर तिने आनंद व्यक्त केला असला तरीही, “चर्चा फक्त माझ्या नावाची झाली” असंही तिने आपल्या ब्रॉडकास्ट चॅनेलमध्ये सांगितलं. निक्कीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास वाद-भांडणांशिवाय अरबाजमुळे देखील तेवढाच चर्चेत आला. अरबाज आणि तिची ग्रँड प्रिमियरलाच ओळख झाली आणि पहिल्या आठवड्यापासून दोघांच्या प्रेमाचे वारे ‘बिग बॉस’च्या घरात वाहू लागले.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : अरबाज पुन्हा आला! निक्की थेट विचारणार जाब, Bigg Boss च्या घरात शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट
निक्की-अरबाज Bigg Boss नंतर एकत्र
निक्की-अरबाजच्या ( Nikki And Arbaz ) नात्यात मध्यंतरी बरेच गैरसमज निर्माण झाले होते. दोघेही केवळ शोसाठी एकत्र असल्याचं वक्तव्य देखील घरातील अन्य सदस्यांकडून करण्यात आलं. मात्र, फिनालेआधीच्या रियुनियला ( सगळ्या स्पर्धकांची रिएन्ट्री ) घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर अरबाजने निक्कीसमोर बसून सगळ्या गोष्टींबाबत खुलासा केला. शो संपल्यावर हे दोघं एकत्र येणार का याबाबत त्यांच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती.
ग्रँड फिनाले ( Bigg Boss Marathi ) सोहळा संपल्यावर निक्की-अरबाज एकाच गाडीत बसून ‘बिग बॉस’च्या सेटवरून रवाना झाले होते. आता यानंतर निक्कीने अरबाजबरोबर पहिला सेल्फी फोटो शेअर केला आहे. या फोटोला निक्कीने “हार्ट इमोजी आणि #arnik #nikbaz” असे हॅशटॅग्ज दिले आहेत.
निक्की-अरबाजच्या सेल्फी फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “बाई हा काय प्रकार”, “बाई निक्की तांबोळीची क्रेझ”, “अरबाज आणि निक्की फॉरएव्हर”, “टचवूड…” अशा प्रतिक्रिया युजर्सनी निक्की-अरबाजचा फोटो पाहून दिल्या आहेत. फिनाले संपल्यावर आतापर्यंत सगळे स्पर्धक माध्यमांसमोर व्यक्त झाले आहेत. मात्र, निक्की यापासून दूर आहे…तिने सोमवारी केवळ अभिजीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे आता या सेल्फी फोटोनंतर निक्की प्रत्यक्ष प्रसारमाध्यमांसमोर येऊन तिचा प्रवास आणि अरबाजबरोबरच्या नात्याविषयी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.