Bigg Boss Marathi : आर्या आणि निक्कीमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात झालेला वाद आता सर्वश्रुत आहे. या वादानंतर आर्याने निक्कीला शोमध्येच कानाखाली मारण्याची घटना घडली होती. यामुळे या दोघींमधला वाद टोकाला जाऊन निक्कीने आर्याला ताबडतोब घराबाहेर काढण्याची विनंती ‘बिग बॉस’च्या टीमला केली होती. ‘कोणत्याही सदस्यावर हात उचलणं हे ‘बिग बॉस’ शोच्या महत्त्वाच्या नियमांचं उल्लंघन आहे’ त्यामुळे तात्काळ व्हिडीओ क्लिप्स, फुटेज तपासून टीमने आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्या बाहेर येताच परिस्थिती नेमकी उलट होती. Bigg Boss ने घराबाहेर काढून देखील तिला बाह्यजगात सर्व स्तरांतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रेमामुळे आर्या सुद्धा भारावून गेली होती. वाइल्ड कार्ड म्हणून तिची एन्ट्री पुन्हा घरात व्हावी यासाठी अनेकांनी जोर लावला होता. पण, यंदाचा शो ७० दिवसांत संपल्याने या चर्चांवर कालांतराने पडदा पडला.

हेही वाचा : “लिप फिलर है क्या…”, Bigg Boss फेम आर्याचा नवीन रॅप चर्चेत; नाव न घेता सणसणीत टोला, रोख निक्कीकडे?

“आपण निक्कीला कानाखाली मारलं ही चुकीची गोष्ट आहे पण, यामुळे निक्की बरोबर आहे असंही होत नाही” असं आर्याने अनेक मुलांखतीमध्ये सांगितलं आहे. आता एका नव्या रॅपच्या माध्यमातून आर्याने पुन्हा एकदा निक्कीला सणसणीत टोला लगावल्याचं पाहायला मिळालं आहे. यानंतर निक्कीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. निक्कीने ही स्टोरी शेअर केल्यावर त्याला ‘एक मोटा हाथी’ असं बालगीत लावून आर्याला अप्रत्यक्षपणे ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

“मुली…तू निक्कीच्या नावावर अजून किती फुटेज घेणार आहेस. शोमध्ये सुद्धा सतत तुझ्या तोंडात निक्कीचं नाव असायचं. आता तू निक्कीच्या नावाने हे नवीन भजन गायला सुरुवात केली आहेस. आयुष्यात थोडी पुढे जा…अजून किती दिवस निक्कीच्या नावावर फुटेज खाणार? शो संपला! स्वत:च्या हिंमतीवर पुढे जा आणि विसरु नकोस तुला त्या घरातून बाहेर काढलंय…” निक्कीच्या फॅनपेजवरून शेअर केलेली ही स्टोरी अभिनेत्रीने तिच्या मूळ अकाऊंटवरून रिशेअर करत त्याला, “आय लव्ह यू Nikkians! सर्वांनी माझ्या नावाने फुटेज घ्या…कारण ब्रँड सर्वांनाच आवडतो” पुढे, या स्टोरीला निक्कीने “एक मोटा हाथी” हे गाणं लावत आर्याला अप्रत्यक्षपणे वाढलेल्या वजनावरून ट्रोल केलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 18: “हे काय चाललंय?” सलमान खानच्या शोमधील तीन हॉट वाइल्ड कार्डची एन्ट्री पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi

निक्कीच्या या पोस्टवर उत्तर देण्यासाठी आर्याने देखील वजन काट्यावर उभं राहून तिचं सध्याचं वजन जाहीरपणे सर्वांना सांगितलं आहे. सध्या तिचं वजन ७०.२ किलो असून, लवकरच म्हणजेच “३० नोव्हेंबरपर्यंत मी ६० किलो वजन करेन” असं तिने जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच “मी वजन कमी करण्यात यशस्वी झाले नाही… तर, बँकेतून १ लाख रुपये तुला ट्रान्सफर करेन” असंही आर्या या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

दरम्यान, आर्याच्या सर्व चाहत्यांनी तिला वजन कमी कर पण, स्वत:ची काळजी घे असा सल्ला कमेंट्स सेक्शनमध्ये दिला आहे. याशिवाय निक्की-आर्याचं हे सोशल मिडिया वॉर आणखी दिवस चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi nikki tamboli angry on aarya jadhao new rap shares post and troll her for gaining weight softnews sva 00