Bigg boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनमध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट येणार याची माहिती रितेशने आधीच सर्व स्पर्धकांना दिली होती. यानुसार गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर एक नवीन खोली उघडण्यात आली आणि या खोलीचं नाव ‘भाऊची चक्रव्यूह रुम’ असं ठेवण्यात आलं आहे. या रुममध्ये स्पर्धकांना त्यांच्याविषयी घरात काय चुगली केली जाते याचे व्हिडीओ दाखवले जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘भाऊची चक्रव्यूह रुम’ या खोलीत जाण्याचा पहिला मान गेल्या आठवड्यात छोटा पुढारी असलेल्या घन:श्यामला मिळाला होता. तसेच त्याच्यानंतर अभिजीतला देखील या खोलीत पाठवण्यात आलं होतं. या आठवड्यात निक्की या खोलीत चुगली ऐकण्यासाठी जाईल असं रितेशने कालच्या भागातच स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “रितेशला ठरवून कुणाचा अपमान करता येत नाही”, लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट; म्हणाली, “त्याच्या डोळ्यात…”
Bigg Boss Marathi : ग्रुप A मध्ये पडणार मोठी फूट
रितेशने आधीच सांगितल्याप्रमाणे आजच्या भागात या चक्रव्यूह खोलीत चुगली ऐकण्यासाठी निक्की जाणार आहे. परंतु, आतमधून बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. याचं मुख्य कारण म्हणजे तिचेच मित्र तिच्याविषयी घरात चुगली करत असल्याचे व्हिडीओ निक्कीला दाखवण्यात येतात. अरबाज, घन:श्याम, वैभव या सगळ्यांवर ती प्रचंड भडकते.
चक्रव्यूह खोलीतून बाहेर येताच निक्की म्हणते, “या टाळ्या आमच्या फेक A ग्रुपसाठी आहेत… या लोकांच्या बोलण्यामध्ये दम तर नाहीच आहे आणि हे सगळे लोक ( अरबाज, वैभव, घन:श्याम ) हलके आहेत सर. मी याक्षणी सांगते ग्रुप A ला ट्रॉफी उचलू देणार नाही.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : “राम राम मंडळी…”, म्हणत ‘बिग बॉस मराठी’मध्ये आल्या कंगना रणौत! सदस्यांना दिला मजेशीर टास्क
निक्कीने थेट आव्हान दिल्याने अरबाज देखील या प्रोमोमध्ये काहीसा संतापल्याचं पाहायला मिळत आहे. आता या चुगलीनंतर ग्रुप A राहणार की नाही? अरबाज, वैभव, निक्की, जान्हवी, घन:श्याम यांची मैत्री टिकणार की नाही? असे बरेच प्रश्न उपस्थित होतात.
नेटकऱ्यांनी मात्र या प्रोमोवर अतिशय हास्यास्पद प्रतिक्रिया दिल्या आहेत. “Group A ला ट्रॉफी उचलू देणार नाही आणि आपण हिला… मजाच मजा”, “ट्रॉफी तर सुरज उचलणार”, “Group A ला आम्हीच (प्रेक्षक) ट्रॉफी उचलू देणार नाही…”, “एकच मन आहे रितेश भाऊ किती वेळा जिंकणार A टीमला कितीवेळा रडवणार”, “आगीत तेल ओतायचं काम बिग बॉसकडून खूपच छान पद्धतीने होत आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.