Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची नुकतीच सांगता झाली आहे. यंदाचं पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये संपलं. यावर्षी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारी पहिली स्पर्धक निक्की तांबोळी ठरली होती. तिने टास्क खेळून, भांडणं करून संपूर्ण ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व गाजवलं होतं. मात्र, निक्कीला विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेशने जाहीर केल्याप्रमाणे पाचव्या पर्वाच्या टॉप-३ स्पर्धकांमध्ये निक्की होती. पण, तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानत घराचा निरोप घ्यावा लागला. निक्कीने घरातून एक्झिट घेतल्यावर सूरज आणि अभिजीत टॉप-२ फायनलिस्ट ( Bigg Boss Marathi ) ठरले. घरातील टॉप-६ सदस्यांना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वोटिंग करण्यात येत होतं. अखेर या चुरशीच्या लढाईत विजेतेपदावर सूरज चव्हाणने नाव कोरलं. एलिमिनेट होण्यापूर्वी निक्कीला सुद्धा मनात ती एव्हिक्ट होईल याची खात्री होती आणि तिचा अंदाज तंतोतंत खरा ठरला.

हेही वाचा : लहानपणी आई-वडिलांचं निधन, सख्ख्या ५ बहिणी अन्…;Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास, जाणून घ्या…

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळीची पहिली पोस्ट

आता घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) आल्यावर निक्कीने पहिली पोस्ट शेअर करत तिच्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत. निक्की लिहिते, “हा शेवट नाहीये… ही एका नव्या आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम आणि पाठिंबा कायम ठेवा.”

निक्कीच्या आई प्रमिला यांनी लेक एव्हिक्ट झाल्यावर सूरजसमोर कोणाचा निभाव लागू शकत नाही. अशी प्रतिक्रिया रितेश देशमुखला दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून मिळणारा पाठिंबा पाहता सूरज जिंकणार याचा अंदाज सर्वांनाच आला होता. मात्र, घरातून निरोप घेताना रितेश देशमुखसह ‘बिग बॉस’ने निक्कीला, “कन्टेंटची महाराणी, queen of एंटरटेनमेंट” अशी उपमा दिली आहे.

हेही वाचा : सूरज चव्हाण Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरल्यावर जिनिलीया देशमुख ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli ( निक्की तांबोळीची पहिली पोस्ट )

दरम्यान, आता येत्या काळात निक्की कोणत्या तांबोळी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय निक्की अरबाजबरोबरच्या नात्याविषयी काय भूमिका घेणार या निर्णयाची देखील तिचे तमाम चाहते वाट पाहत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi nikki tamboli first post after lost in the grand finale sva 00