Bigg Boss Marathi Nikki Tamboli : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं. पहिल्याच दिवशी शोमध्ये निक्की अन् वर्षा उसगांवकरांचे वाद झाले होते. त्यामुळे हा सीझन सुरू झाल्यापासून निक्की प्रचंड चर्चेत होती. हळुहळू तिचे घरातील डायलॉग सोशल मीडियावर लोकप्रिय होऊ लागले. “बाईSSS हा काय प्रकार” या डायलॉगने तर गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असूनही निक्कीला ‘बिग बॉस’च्या घरात उचलेल्या काही चुकीच्या पाऊलांमुळे विजेतेपद गमवावं लागलं. तरीही तिच्या चाहत्यांना शेवटपर्यंत निक्की हा शो जिंकेल अशी अपेक्षा होती. मात्र, सूरज चव्हाणने यंदाच्या पर्वावर आपलं नाव विजेता म्हणून कोरलं आहे. यावर आता निक्कीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

neelam shirke opens about healthy competition with aditi sarangdhar
“आमच्यात टक्कर नक्कीच होती, पण…”, अदिती सारंगधरबद्दल नीलम शिर्के काय म्हणाली? सांगितला ‘असंभव’ मालिकेचा किस्सा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”

हेही वाचा : Video : “ट्रॉफी मिळाली नाही याची खंत…”, ग्रँड फिनालेनंतर धनंजयची पहिली पोस्ट! भावुक होत म्हणाला, “हे उपकार…”

Bigg Boss Marathi : निक्कीची प्रतिक्रिया चर्चेत

निक्कीने इन्स्टाग्रामवर नवीन ब्रॉडकास्ट चॅनेल सुरू केलं आहे यावर चाहत्यांशी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली, “हॅलो…मी निक्की तांबोळी…मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की, थँक्यू मनापासून तुम्ही मला एवढे वोट दिले… मला बिग बॉस मराठीचं सेकंड रनर अप बनवलं. मी या संपूर्ण सीझनमध्ये तुमचं मनापासून मनोरंजन केलं. माझे डायलॉग तुम्ही सर्वांनी एवढे जास्त फेमस केले…यापुढे मी असंच काम करत राहीन. माझ्या प्रोजेक्ट्सबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देत राहीन. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम! मला एवढा पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू… आय लव्ह यू तुम्हा सर्वांना बाई…हा काय प्रकार”

तसेच आपल्या भावना व्यक्त केल्यावर निक्कीने आपल्या चाहत्यांसाठी एक मेसेज शेअर केला आहे. यात ती म्हणते, “ट्रॉफी त्याच्याकडे पण, धमाका फक्त माझ्या नावाचा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं खरं कोण जिंकलं?”

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस, पत्नी व मुलींबरोबर ‘असं’ केलं सेलिब्रेशन, पाहा Video

Bigg Boss Marathi Nikki Tamboli
Bigg Boss Marathi Nikki Tamboli

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. आता येत्या काळात निक्की पुन्हा कोणत्या मराठी शोमध्ये दिसणार याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader