Bigg Boss Marathi Nikki Tamboli Mother : बहुप्रतीक्षित ‘फॅमिली वीक’ टास्क ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच पार पडला. आजच्या ( २७ सप्टेंबर ) भागात अंकिता, पंढरीनाथ, निक्की आणि सूरज यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी घरात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून निक्की तिच्या आईची आतुरतेने वाट पाहत होती. अखेर मुख्य प्रवेशद्वारात आपल्या आईला पाहताच निक्कीच्या अश्रूंचा बांध फुटला. ती प्रचंड भावुक झाली होती. ‘फॅमिली वीक’ टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला तो नेमका कसा गेम खेळतोय हे जाणून घेण्याची मोठी संधी मिळते आणि निक्कीने या संधीचं सोनं केलं आहे.

निक्कीचे आई-बाबा दोघेही लेकीला भेटण्यासाठी घरात आले होते. बाहेर वागणं-बोलणं कसं दिसतंय इथपासून ते अरबाजच्या कमिटेड रिलेशनशिपपर्यंत निक्कीच्या आईने तिला बऱ्याच गोष्टींची माहिती दिली. मात्र, घरात प्रवेश केल्यावर सर्वात आधी त्यांनी आपल्या लेकीची कानउघडणी केली. “तू चांगलं खेळतेस पण, रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे” असा सल्ला प्रमिला यांनी निक्कीला दिला. यानंतर निक्कीने तिच्या आईची ओळख अन्य सदस्यांना करून दिली.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “बाईSS…”, म्हणत ‘बिग बॉस’च्या घरात आली राखी सावंत! निक्कीच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग; ताज्या झाल्या ४ वर्षांपूर्वीच्या आठवणी

निक्कीच्या आईने वर्षा उसगांवकराची मागितली माफी

निक्कीच्या आईने सर्वांना भेटल्यावर आनंद व्यक्त केला. वर्षा उसगांवकरांशी भेट झाल्यावर प्रमिला यांनी लेकीच्या वतीने या ज्येष्ठ अभिनेत्रीची माफी मागितली. निक्कीने वर्षा यांची अक्कल काढत त्यांच्याशी भांडताना अपशब्द वापरले होते, यानंतर एके दिवशी तिने वर्षा उसगांवकर यांच्या मातृत्वावर भाष्य केलं होतं. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निक्कीने, “मी वर्षा उसगांवकरांना आधी ओळखत नव्हते” असं वक्तव्य केलं होतं. या सगळ्यावर आता प्रमिला तांबोळी यांनी वर्षा यांची माफी मागितली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

निक्कीने आपल्या आईची वर्षा उसगांवकरांशी भेट घालून दिल्यावर प्रतिमा म्हणाल्या, “तू सोडलीस तर… वर्षा ताईंना कोण नाही ओळखत हे सांग…मी त्यांना खूप चांगलं ओळखते. त्यांचं मी काम पाहिलंय. त्या जेव्हा रंगभूमीवर काम करायच्या तेव्हापासून मी त्यांचा प्रवास पाहिलाय. तिच्याकडून मी तुमची माफी मागते. ती खरंच तुम्हाला ओळखत नव्हती पण, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्कीच्या आईने मागितली वर्षा उसगांवकरांची माफी

हेही वाचा : Bigg Boss Marathi – ‘बिग बॉस मराठी ५’ फक्त ७० दिवसांत का संपतंय? छोटा पुढारीचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “शोला टीआरपी देणारेच…”

निक्की आणि वर्षा उसगांवकरांचे घरात पहिल्या दिवसापासून एकमेकींशी वाद झाले होते. बऱ्याचदा भांडण करताना निक्कीने चुकीच्या शब्दांचा वापर केला होता…यामुळे तिची भाऊच्या धक्क्यावर देखील निक्कीची कानउघडणी करण्यात आली होती. अखेर आता तिची आई घरात आल्यावर त्यांनी सुद्धा लेकीला, “विचार करून शब्द वापर, जास्त भांडू नकोस” असे सल्ले दिले आहेत.

Story img Loader