Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यावर्षी हिंदी बिग बॉस गाजवून आलेल्या निक्की तांबोळीने एन्ट्री घेतली. शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर पहिल्या दिवसापासून निक्कीची सर्वत्र चर्चा होत होती. सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये वर्षा उसांगावकर विरुद्ध निक्की तांबोळी असा वाद देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरात पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये निक्कीला या वादासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

“आपल्यापेक्षा प्रसिद्धी व्यक्तींना टार्गेट करूया असा कोणता गेमप्लॅन सुरुवातीला होता का?” या प्रश्नाचं उत्तर देताना निक्की म्हणाली, “कोण प्रसिद्ध आहे इथे? मला अभिजीतशिवाय इथे कोणीच प्रसिद्ध आहे असं वाटत नाही. पॅडी दादा आणि वर्षा ताईंबद्दल मला आता समजलं. वर्षा ताई कोण आहेत हे मला माहिती नव्हतं. मला फक्त अभिजीत सावंत माहिती होता.” तिचं वक्तव्य ऐकल्यावर घरात सगळेच चक्रावून गेले होते.

हेही वाचा : Quiz : निक्की तांबोळी ते ‘गुलीगत’ फेम सूरज चव्हाण; Bigg Boss Marathi 5 बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

जान्हवीने घेतला आक्षेप

निक्कीच्या या वक्तव्यावर जान्हवीने आक्षेप घेतला. यावर निक्कीने, “तुला काय वाटतं…तुझ्या या बोलण्याने मला व्होटआऊट करतील…मी पण बघते मग…” पुढे निक्की विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “मी आता मान्य करते वर्षा ताई स्टार आहेत… एव्हरग्रीन आहेत. पण, मला आधी त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं. घरात आल्यावर समजलं. त्यात काय आहे एवढं? आता त्यांच्याबद्दल मला माहिती आहे.” वर्षा उसगांवकरांनी या उत्तरावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा : “हे औदार्य महागात पडेल…”, पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंचा विरोध, थेट थिएटर मालकांना दिली ताकीद

दरम्यान, निक्की पहिल्या दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रचंड चर्चेत आहे. घरात केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे यापुढे सीझन संपेपर्यंत तिला कॅप्टन होता येणार नाही अशी शिक्षा देखील निक्कीला देण्यात आली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “बिग बॉस ७० दिवसांतच गुंडाळणार…”, तृप्ती देसाईंचा पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना सवाल; म्हणाल्या…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अरबाज व निक्की

आठव्या आठवड्यात निक्की आणि घरातील तिचा मित्र अरबाज असे दोघेही नॉमिनेट आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अन्य सदस्य सेफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, निक्की आणि अरबाज अनसेफ आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader