Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाचा सीझन ७० दिवसांत गाशा गुंडाळणार अशा चर्चा चालू होत्या. अखेर ‘बिग बॉस’कडून यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यापूर्वी घरात ‘मालक आणि सांगकामे’ हा टास्क पार पडणार आहे.

अरबाज घराचा नवव्या आठवड्यासाठी कॅप्टन होता. मात्र, गेल्या आठवड्यात तो एलिमिनेट झाल्यामुळे सध्या घराला कोणीच कॅप्टन नाहीये. यामुळे निक्कीने घरातली अनेक कामं करण्यास विरोध दर्शवला होता. अखेर ‘बिग बॉस’ने मंगळवारी सगळ्या सदस्यांना ‘मालक आणि सांगकामे’ हा टास्क देऊन घरातील आठ जणांची दोन टीममध्ये विभागणी केली. यापैकी विजयी टीम घराची ‘मालक’ होणार आहे तर, हरणारी टीम ‘सांगकाम्या’ होऊन विजयी टीमच्या सदस्यांनी सांगितलेली सगळी कामं करणार आहे.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Important update regarding Raigad Fort Project to build Shiv Srushti at Pachad gains momentum
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
fire broke out Bavdhan area, Bavdhan area fire,
पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक

हेही वाचा : “चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

सगळी कामं करून जान्हवीला अश्रू अनावर

निक्कीची टीम यामध्ये विजयी होणार हे प्रोमोमधून ( Bigg Boss Marathi ) स्पष्ट झालं आहे. निक्कीच्या टीममध्ये सूरज, वर्षा आणि धनंजय हे सदस्य होते. तर, हरलेल्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, जान्हवी आणि पॅडी हे चार जण आहेत. या चौघांना आता घरात सांगकाम्या होऊन सगळी कामं करावी लागणार आहेत.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अभिजीत निक्कीला हवा तसा चहा बनवून देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, अंकिता-जान्हवी दोघी मिळून वर्षा उसगांवकरांचे पाय दाबून देत आहे. याशिवाय गार्डन परिसरात पंढरीनाथ सूरजच्या पायाला तेल लावून देत असल्याचं या प्रोमोमध्ये दिसत आहे. जान्हवी किचनमध्ये पीठ मळताना म्हणते, “बिग बॉस’ डाव्या हाताने कसं पीठ मळतात?” यानंतर ती सुद्धा वर्षा यांच्या पायाला तेल लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. घरातली ही सगळी कामं करून शेवटी जान्हवीला अश्रू अनावर होतात.

हेही वाचा : Urmila Matondkar Divorce: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा ८ वर्षांचा संसार मोडला? मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी अर्ज केला दाखल

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : जान्हवीला अश्रू अनावर

‘मालक विरुद्ध सांगकामे’ हा संघर्ष घरात आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. ऐन महाअंतिम ( Bigg Boss Marathi ) सोहळ्यापूर्वी हा टास्क झाल्याने याचा परिणाम होऊन प्रेक्षकांना नक्कीच घरातील सदस्यांचा खरा चेहरा दिसणार असं मत कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी मांडलं आहे.

Story img Loader