Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्याची सुरुवातच भांडणाने झाल्याचं पाहायला मिळालं. घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये ग्रुप ‘ए’ व ग्रुप ‘बी’ मध्ये टोकाचे वाद झाले. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सर्व सदस्यांना पुन्हा कधीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करू नका असं बजावलं होतं. परंतु, पुढच्या दोन दिवसांतच रितेशचा शब्द न पाळता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पंढरीनाथ कांबळेच्या करिअर संदर्भात जान्हवीने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरीनाथ कांबळेचा जान्हवीने अपमान केल्यावर मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, अभिजीत केळकर, अमेय खोपकर, मेघा धाडे, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी पोस्ट शेअर करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर, नेटकरी देखील जान्हवीवर भडकले आहेत. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर पंढरीनाथ कांबळेची मुलगी ग्रीष्माने पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “शनिवारी खाली मान टाकून गालातल्या गालात हसून सॉरी…”, योगिताच्या नवऱ्याची सूचक पोस्ट; सौरभ म्हणाला…

पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे. हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं.

खरंतर “Overacting” हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, Contestents च्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी Especially वर्षा उसगांवकर यांच्या आणि पंढरीनाथ कांबळेच्या Career वर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनंही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही.

मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस.

जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही… आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या Career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं!! हा तुझा “Fair Game” संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव.

त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते.
माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.

पंढरीनाथ कांबळे ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : सुरज चव्हाणला घरी ‘या’ टोपणनावाने मारतात हाक; गुलीगतच्या आत्याने सांगितली खऱ्या नावामागची रंजक गोष्ट

दरम्यान, पंढरीनाथ यांच्या लेकीची पोस्ट वाचून मराठी कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे. विशाखा सुभेदारने कमेंट करत, “हर घर ऐसी बेटी भेंजो.. भगवान शाब्बास पोरी” अशी प्रतिक्रिया ही पोस्ट वाचून दिली आहे. तर, लेखिका व अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने “खूप कौतुक आहे ज्या पद्धतीने हे लिहिलं आहे त्याबद्दल. शब्द आणि शब्द पटला” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar sva 00
Show comments