Bigg Boss Marathi Paddy Kamble Eliminate : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा खेळ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. नुकताच स्पर्धेच्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने घराचा निरोप घेतला. त्यामुळे ऐन शेवटच्या क्षणी पॅडीची फिनालेपर्यंत पोहोचण्याची संधी हुकली आहे. पंढरीनाथचं घरातून एक्झिट घेणं हे प्रत्येकासाठीच धक्कादायक होतं. गेल्या काही दिवसांपासून पॅडीचा खेळ बहरला होता. याशिवाय निक्कीला सुद्धा तो पुरून उरला होता. त्यामुळे त्याच्या एलिमिनेशनने घरातील त्याचे जवळचे मित्र देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा आता दहावा आणि अंतिम आठवडा सुरू होणार आहे. दरवर्षी हा शो १०० दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेतो. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच हा शो ७० दिवसांनी संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात नॉमिनेशन टास्क पार पडला नव्हता. याउलट ‘बिग बॉस’ने घरात असणाऱ्या सगळ्या ८ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं होतं. या ८ जणांमध्ये चुरशीची लढत गेल्या आठवड्याभरात पाहायला मिळाली. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी पॅडी कांबळेने या घराचा निरोप घेतला.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

हेही वाचा : Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट

हेही वाचा : “करिअरच्या सुरुवातीलाच मुलीने केलेली फसवणूक…”, अरबाज पटेल संघर्षाच्या काळाबद्दल सांगताना म्हणाला, “वडिलांचा अपघात आणि आईचे सोने गहाण…”

पंढरीनाथचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला

पॅडी घरातून ( Bigg Boss Marathi ) निरोप घेत असताना म्हणाला, “मला फिनालेपर्यंत पोहोचता आलं नाही ही एक सल मनात कायम राहणार आहे…पण, मी माझ्या प्रवासाने आनंदी आहे.”

दरम्यान, आता पंढरीनाथच्या एलिमिनेशननंतर घरात फक्त ७ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण होणार हे पाहणं आता शेवटच्या आठवड्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : Video: ‘फुलवंती’ चित्रपटातील कलाकार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात; गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळीबरोबर सदस्यांनी केली धमाल-मस्ती

‘बिग बॉस मराठी’चा ( Bigg Boss Marathi ) ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. यासाठी भाऊच्या धक्क्यावर जवळपास दोन आठवड्यांनी रितेश देशमुख उपस्थिती लावणार आहे. यंदा १०० नव्हे तर फक्त ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांना ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता मिळणार आहे.

Story img Loader