Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पार पडत आहे. या आठवड्यात घराचा कॅप्टन कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी वर्षा, सूरज, अरबाज आणि धनंजय हे चार सदस्य कॅप्टन पदासाठी दावेदार ठरले आहेत. यांच्यापैकीच एक आठव्या आठवड्यात घराचा कॅप्टन होणार आहे.

पहिल्या दिवसापासून सूरज, धनंजय एकत्र ‘टीम बी’कडून ( Bigg Boss Marathi ) खेळत आहेत. त्यामुळे अभिजीत, अंकिता, पंढरीनाथ कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लागलं आहे. अशातच एका नव्या प्रोमोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सूरजला लिहिता-वाचता येत नाही. त्याचं शालेय शिक्षण देखील पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून ‘टीम बी’चे सगळे सदस्य आणि विशेषत: पंढरीनाथ त्याला मार्गदर्शन करत असतो.

tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”

हेही वाचा : ठरलं तर मग : प्रतिमाची वाचा परत आली! लेकीसाठी पूर्णा आजीला अश्रू अनावर, तर प्रिया घाबरून…; पाहा मालिकेचा भावुक प्रोमो

Bigg Boss Marathi : पॅडी सूरजवर संतापला

पॅडी पहिल्या दिवसापासून सूरजची प्रचंड काळजी घेतो. पण, समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरजचे लाडके पॅडी दादा पहिल्यांदाच त्याच्यावर भडकल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतरही सूरज त्याचं ऐकत नाहीये. एका टास्कदरम्यान पंढरीनाथ सूरजला “अरे मध्ये नको बोलूस…” असं सांगतो. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची होते. यामध्ये अंकिता मध्यस्थी करून सूरजला त्याची चूक समजावून सांगते. यावर सूरज “मला रागच येणारच की…” असं म्हणताना दिसत आहे. यानंतर पंढरीनाथ त्याला येऊन सॉरी बोलतो. तरीही सूरज ऐकत नाही. यामुळे अंकिता त्याला “तू जर अशी किंमत ठेवणार नाहीस तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही” असं स्पष्ट शब्दात सांगते.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “Strategy त्यांच्याबरोबर करणार आणि आम्ही…”, पंढरीनाथने वर्षा उसगांवकरांना थेट विचारला जाब, नेटकरी म्हणाले, “भाऊ मस्तच…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : पॅडी सूरज वादावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया हा प्रोमो पाहून उमटल्या आहेत. सूरजचे समर्थक, “तू एकटा खेळ…आम्ही तुझ्या पाठीशी आहोत”, “बी टीममध्ये त्याला कधीच बोलायला देत नाहीत”, “यांना वाटतं सूरजने यांच्या मनासारखं वागावं” अशा प्रतिक्रिया हा प्रोमो पाहून देत आहेत.

तर, याउलट काही नेटकऱ्यांनी, “सूरजला गेमच कळत नाही”, “सूरज अतिशय चुकीचा खेळतो”, “मी सूरजचा फॅन आहे पण अंकिताचं बरोबर आहे” अशा कमेंट्स करत त्याच्या खेळाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आता या भांडणावर रितेश भाऊच्या धक्क्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader