Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. त्याचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. पण, ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यावर त्याला सर्वात मोठी साथ पंढरीनाथ कांबळेने दिली. पॅडी आणि अंकिताने सूरजला पदोपदी मार्गदर्शन केलं. सूरजचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणीच आई-वडिलांचं निधन झाल्यामुळे त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला.

घरातील बेताच्या परिस्थितीमुळे सूरजला त्याचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. घरात एन्ट्री घेण्यापूर्वी ‘बिग बॉस’च्या टीमने त्याला विशेष ट्रेनिंग दिलं होतं. कारण, एवढं मोठं घर, बाथरुम, स्विमिंग पूल अशा कोणत्याच गोष्टी सूरजला माहिती नव्हत्या. यानंतर खरा खेळ सुरू झाल्यावर प्रत्येक टास्कमध्ये पॅडीने त्याची मदत केली. अंकिता व पॅडीने क्षणोक्षणी त्याला घरातील सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. याच सगळ्याची पोचपावती म्हणून सूरज विजेता ( Bigg Boss Marathi ) ठरल्यावर थेट पॅडीकडे पोहोचला.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “१० वर्ष प्रायोगिक नाटकं, साडेतीन वर्ष मालिका करून…”, सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा झापूक झुपूक बोलून…”

पॅडीची सूरजसाठी खास पोस्ट

सूरजने विजेता झाल्यावर त्याची ट्रॉफी पंढरीनाथकडे सुपूर्द केली आणि त्याला घट्ट मिठी मारली. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. एवढंच नव्हे तर नेटकऱ्यांनी देखील हे फोटो पाहून यावर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पॅडी हे फोटो शेअर करत लिहितो, “या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान देणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!”

हेही वाचा : Bigg Boss Marathi- ट्रॉफी त्याची पण, धमाका फक्त माझ्या नावाचा…”, सूरजच्या विजयानंतर निक्कीची पहिली प्रतिक्रिया; थेट प्रश्न विचारत म्हणाली…

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या भावुक प्रतिक्रिया

हेही वाचा : Video: “त्यांची तोंडं बंद केलीस…”, सूरज चव्हाणच्या विजयावर सुरेखा कुडची यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी सुरुवातीपासून…”

पॅडीने शेअर केलेला फोटो पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. “दोन खरी माणसं एकत्र”, “लेकराच्या विजयाचा बापाच्या चेहऱ्यावरील आनंद!”, “पॅडी भाऊ खरंच क्षमा असावी वोट सूरजला दिल्याबद्दल, तरी तुमच्या मुलानेच ट्रॉफी जिंकली”, “OG माणसं आपली” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये भावुक झाल्याचे इमोजी जोडले आहे.

Story img Loader