Bigg Boss Marathi Pandharinath Kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने एक्झिट घेतली. कमी मतं मिळाल्याने त्याचा घरातील प्रवास तब्बल ६२ दिवसांनी संपला. घराबाहेर आल्यावर पॅडीने त्याचा ‘बिग बॉस’च्या घरातील खेळ, एकंदर प्रवास आणि अन्य सदस्यांविषयी आपली रोखठोक मतं मांडली आहेत. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पंढरीनाथने अभिजीत सावंतविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अभिजीतचा घरात एक वेगळा गेम आहे असं वाटतं का?” या प्रश्नावर पंढरीनाथ म्हणाला, “हो नक्कीच त्याचा वेगळा खेळ आहे. तो फक्त आमच्या ग्रुपमध्ये होता आणि एकत्र आम्ही बसत वगैरे होतो. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर होता पण, हळुहळू मी त्याला गेममध्ये अनेक गोष्टी बोलायला लागलो. कारण, तो इथेही सारवासारव करायचा…तिकडे जाऊन निक्कीकडे सुद्धा बोलायचा. उद्या नॉमिनेशनची वेळ आली, तर निक्कीने घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करू नये… यासाठी तो असं सगळं करत होता.”

हेही वाचा : Video : जान्हवी पुन्हा भडकली! ‘तो’ निर्णय ऐकताच संतापून केली आदळआपट; अभिनेत्रीला अश्रू अनावर

Bigg Boss Marathi : अभिजीत अरबाजविषयी काय म्हणाला?

पॅडी पुढे म्हणाला, “मला वाटतं की, अभिजीतचं खरं रुप आता अंकिताने समोर आणायला सुरुवात केली आहे. जसा अरबाज करत होता ना तसा तो वागतोय. कारण, जे लोक बाथरुम, घराचं क्लिनिंग अशी सगळी मोठी काम करतात त्यांना याचा त्रास होतो…ही मोठी कामं निक्की करतच नाही. जसं अरबाजने केलं त्याचं सॉफ्टर व्हर्जन मला अभिजीतमध्ये दिसतंय. मला फक्त तिथे सर्व बोलता आलं नाही. तरीही मी एका-एका वाक्यात त्याला खूप काही बोलून जायचो.”

“अभिजीतच्या बाजूने उभं राहावं असं मला फार कधीच वाटलं नाही. कारण, तो मुखवटा त्याच्या चेहऱ्यावर मला दिसत होता… तो मुखवटा अजूनही आहे. ग्रँड फिनाले पार पडला की लोकांना कळेल.” असं मत पंढरीनाथ कांबळेने ( Bigg Boss Marathi ) मांडलं आहे.

हेही वाचा : “माझा देव…पॅडी दादा”! घराबाहेर पडलेल्या पंढरीनाथ कांबळेसाठी सूरज चव्हाणची पोस्ट; म्हणाला, “मला कधी…”

पंढरीनाथ कांबळे ( Bigg Boss Marathi Pandharinath Kamble )

दरम्यान, आता अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे सात सदस्य ‘बिग बॉस’च्या स्पर्धेत कायम आहेत. आता यांच्यापैकी ग्रँड फिनालेला कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi pandharinath kamble reaction after elimination on abhijeet sawant game sva 00