Bigg Boss Marathi Pandharinath Kamble : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेने एक्झिट घेतली. पॅडीने घराचा निरोप घेतल्यावर अंकिता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल ६२ दिवसांच्या प्रवासानंतर अभिनेत्याने ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला पण, घराबाहेर आल्यावर पॅडीने त्याचा एकंदर प्रवास, घरातील अन्य सदस्यांचे स्वभाव याबाबत अनेक मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात अरबाज-निक्कीच्या नात्याचा एक वेगळाच ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळालं. यावर ‘सकाळ’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पॅडीने आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

निक्की-अरबाजविषयी मांडलं स्पष्ट मत

पंढरीनाथला निक्की-अरबाजचं घरातील नातं आणि त्यांच्या मैत्रीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “त्यांच्यात कसली मैत्री…ती फालतुगिरी सुरू होती. मित्र आम्ही पण होतो मी-योगिता, मी आणि अंकिता जे होतो ती मैत्री होती. या दोघांनी उगाच काहीतरी शो ऑफ करण्यासाठी अफेअर असल्याचं लेपन केलं होतं. उगाच गुलूगुलू बोलणं वगैरे सुरू असायचं. घरात एकमेकांशी होऊदे मैत्री पण, बाहेर जाऊन तुम्ही काय ते अफेअरचं बघा. एका बेडवर झोपतात… आता काल आलेले तुम्ही यांच्यात एवढी किती दिवसांची ओळख होती. वर्षभर सुरू असलेल्या अफेअरमध्ये पण लोक असे वागत नाहीत तसे घरात निक्की-अरबाज वागत होते.”

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!

हेही वाचा : Bigg Boss मध्ये शिव ठाकरेची एन्ट्री! घरात पाऊल ठेवताच सर्वांना म्हणाला, “तुम्हा सर्वांना महाराष्ट्राकडून…”

पॅडी ( Bigg Boss Marathi ) पुढे म्हणाला, “निक्की-अरबाजचं नातं फक्त शोसाठी होतं. तो एक दिखावा होत आणि तो दिखावा त्यांचा फाटला गेला, जेव्हा निक्कीची आई घरात आली तेव्हा तिने सत्य परिस्थिती काय आहे ती सांगितली. या सगळ्या गोष्टी निक्कीला आता तिची आई घरात आल्यावर समजल्या आणि मग ती बदलली. आता ती अभिजीतबरोबर चांगली बोलायला लागली आहे.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अरबाज पटेल व निक्कीच्या नात्यावर पॅडीची प्रतिक्रिया

हेही वाचा : Bigg Boss Marathi – निक्की तांबोळी ठरली यंदाची पहिली Finalist! अरबाज पटेलच्या कमेंटने वेधलं लक्ष, तर नेटकरी म्हणाले, “हिला फुकटात…”

“अरबाज घराबाहेर गेल्यानंतर निक्कीला एक आधार हवा होता तो तिने आता अभिजीतच्या रुपात पकडालाय. ती या घरात फक्त भांडणं आणि वाद करून पुढे चाललीये. तर, अभिजीत सावंत खूप चतुराईने खेळत पुढे जातोय” असं स्पष्ट मत पंढरीनाथ कांबळेने मांडलं आहे.

दरम्यान, आता शोमध्ये अंतिम आठवड्याला सुरुवात झाली असून, निक्कीने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली आहे. तसेच घरातील उर्वरित सहा सदस्य आता नॉमिनेट झाले असून यांच्यातील एक जण मिडवीक एलिमिनेशनमध्ये घराचा ( Bigg Boss Marathi ) निरोप घेणार आहे.

Story img Loader