Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा पंढरीनाथ कांबळेने कमी मतं मिळाल्याने नवव्या आठवड्यात निरोप घेतला आहे. पॅडी कांबळे ग्रँड फिनालेच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये दिसेल असा अंदाज त्याच्या चाहत्यांसह ‘बिग बॉस मराठी’च्या काही प्रेक्षकांनी वर्तवला होता. मात्र, मतांच्या स्पर्धेत पंढरीनाथ कमी पडला आणि नवव्या आठवड्यात त्याचं एलिमिनेशन झालं आहे.

“शेवटच्या क्षणी महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचता आलं नाही याची सल कायम मनात राहणार” असं सांगत पंढरीनाथने या घराचा निरोप घेतला. मात्र, एलिमिनेट झाल्यावर पॅडीने एक महत्त्वाचा निर्णय संपूर्ण घरासमोर जाहीर केला आणि त्याच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात येत आहे.

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Farah Khan
“शाहरुख कुठे उभा राहील?” शिल्पा शिरोडकरच्या वजनावर फराह खानने केलेली कमेंट; अभिनेत्री म्हणाली…
gadchiroli tribal couple
मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा; आदिवासी दाम्पत्याची व्यथा, तीन दिवसांपासून उपाशी, पत्नीचे मंगळसूत्र मोडले
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेची संधी हुकली! पंढरीनाथ कांबळे Eliminate; जाताना म्हणाला, “फक्त मनात…”

पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय

‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात पहिल्या दिवसापासून पॅडीने सूरजला खंबीरपणे साथ दिली. शिक्षण पूर्ण झालं नसल्याने सूरजला लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे अनेकदा टास्क समजून घेण्यात सूरजला अडचण निर्माण व्हायची. अशावेळी पंढरीनाथने पुढाकार घेऊन त्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. एवढंच नव्हे तर घराबाहेर गेल्यावर सुद्धा सूरजची साथ सोडणार नाही असं पॅडीने यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं आहे.

घराबाहेर ( Bigg Boss Marathi ) जाताना प्रत्येक सदस्याला आपल्या खात्यात असणारे म्युचुअल फंड्सचे कॉइन्स अन्य सदस्याला द्यायचे असतात. यावेळी पंढरीनाथने अपेक्षेप्रमाणे ५० कॉइन्स सूरजला दिले. मात्र, हे कॉइन देताना अभिनेता म्हणाला, “मी माझ्या कॉइन्सचा नॉमिनी सूरज चव्हाणला करतोय…तो सगळ्या गोष्टींचा नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाहीतर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलंय.”

हेही वाचा : “करिअरच्या सुरुवातीलाच मुलीने केलेली फसवणूक…”, अरबाज पटेल संघर्षाच्या काळाबद्दल सांगताना म्हणाला, “वडिलांचा अपघात आणि आईचे सोने गहाण…”

हेही वाचा : Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…”

Bigg Boss Marathi Season
Bigg Boss Marathi Season 5 : पंढरीनाथ कांबळेचा घरातील प्रवास संपला

पॅडीचे शब्द ऐकताच बाहेर आल्यावर सूरज त्याच्या पाया पडला. एवढंच नव्हे तर पुढे भावुक होऊन सूरजने पॅडीला मिठी देखील मारली. या दोघांचं बॉण्डिंग पाहून सगळेजण भारावून गेले होते. विशेषत: पंढरीनाथने घेतलेल्या पालकत्वाच्या मोठ्या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे.

Story img Loader