Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. घरातील सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण आता पूर्णपणे बदललं असून, पहिल्या दिवसापासून तयार झालेले ग्रुप आता फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज-निक्की तर संपूर्ण घराविरोधात जोडीने लढत असल्याचं पाहायला मिळतंय. वर्षा कॅप्टन झाल्यापासून “मी घरात वॉशरुम स्वच्छ करणार नाही, काम करणार नाही” अशी भूमिका निक्कीने घेतली आहे.

निक्की घरात कोणतंच काम करत नसल्याने जान्हवी सर्वांसमोर “मी बनवलेलं जेवण निक्कीने जेवायचं नाही” असं सांगते. एवढंच नव्हे तर तिला जेवणही देत नाही. “निक्की स्वत: केलेला कचरा तसाच टाकते, भांडी घासत नाही, वॉशरुम स्वच्छ करत नाही त्यामुळे मी केलेलं जेवण तिने जेवायचं नाही” असं जान्हवीचं म्हणणं आहे. यावरून दोघींमध्ये कडाक्याचं भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. जेवण आणि घरातल्या कामांवरून झालेल्या भांडणांमध्ये निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल पुन्हा एकदा चुकीचे शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe : “मी माझ्या भूमिकेवर ठाम”, वादग्रस्त वक्तव्यानंतर सुजय विखेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “साईभक्त आदरणीयच, पण…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “लाज काढलीये या बाईईईने”, सुरेखा कुडची निक्कीवर संतापल्या; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून…”

अभिनेता पुष्कर जोगची पोस्ट

“तुमच्यासमोर मी आत बाथरुममध्ये जाऊन दाखवेन. मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ…माझा बाप बनू नका. समजलं ना…? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा” याशिवाय सध्या निक्की बरंच काही वर्षा उसगांवकरांना बोलत आहे. यावर आता नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी अभिनेता व ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. अभिनेता म्हणतो, “मला एकदा घरी पाठवा… वर्षा उसगांवकर मॅमचा एवढा अपमान मी सहन करू शकत नाही. अरे मर्दांनो उठा… त्या फिक्कीचा माज उतरावा #कहर” या पोस्टमध्ये पुष्करने ‘कलर्स मराठी’ व ‘बिग बॉस मराठी’ला देखील टॅग केलं आहे.

हेही वाचा : Video : सख्ख्या मैत्रिणी झाल्या वैरी! जान्हवी-निक्कीमध्ये जेवणावरून शा‍ब्दिक War; नेटकरी म्हणाले, “आता खरा TRP…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अभिनेता पुष्कर जोगची पोस्ट

दरम्यान, निक्कीच्या वागणुकीवर आता रितेश देशमुख काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याशिवाय यावेळी घरातून बेघर होण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट आहेत. आता घन:श्याम, अभिजीत, सूरज, आर्या, निक्की, अरबाज आणि धनंजय यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader