Bigg Boss Marathi TRP News : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. खरंतर, पहिल्या दिवसापासून या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ‘बिग बॉस मराठी’ आघाडीवर आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळूनही ‘बिग बॉस’ एवढ्या लवकर निरोप घेणार असल्याने सध्या नेटकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमाने शेवटच्या आठवड्यात ऐतिहासिक टीआरपी मिळवत इतिहास रचला आहे. यंदाच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर २८ जुलैला पार पडला होता. गेल्या चार पर्वांच्या तुलनेत हा पाचवा सीझन तुफान गाजला. यावर्षी पहिल्यांदाच रितेश देशमुखने या कार्यक्रमाच्या होस्टिंगची जबाबदारी स्वीकारली होती. आपल्या अनोख्या शैलीने पहिल्या दिवशीच रितेशने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरवण्यासाठी आवडत्या स्पर्धकाला वोट कसे करायचे? जाणून घ्या

Bigg Boss Marathi चा रेकॉर्डब्रेक टीआरपी

गेल्या दोन महिन्यांपासून हा शो टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय मालिका आणि कार्यक्रमांना टक्कर देत आहे. आता हा ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन संपायला अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना या शोने आणखी एक इतिहास रचला आहे. ‘कलर्स मराठी’ने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

“Non-Fiction Entertainment चा खरा BOSS = बिग बॉस मराठी!” असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ने एक पोस्ट शेअर केली आणि गेल्या आठवड्यात तब्बल ५ TVR चे नवे शिखर गाठत ‘बिग बॉस’ने एक नवा इतिहास रचल्याचं जाहीर केलं आहे. शेवटच्या आठवड्यात ‘बिग बॉस’ने टीआरपीच्या शर्यतीत ५ TVR पॉइंट्स मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ‘बिग बॉस’च्या आजवरच्या कोणत्याच सीझनला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं नव्हतं. त्यामुळे सध्या सर्वस्तरांतून ‘बिग बॉस’च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 ची ट्रॉफी पाहिलीत का? अमृता खानविलकर-अमेय वाघने दाखवली पहिली झलक, पाहा Video

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता फक्त ६ सदस्य बाकी राहिले आहे. आता अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या पाच जणांमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण उंचावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi record break trp in last week colors marathi shared post and praised the team sva 00