Bigg Boss Marathi Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये जेलमध्ये जाणारी पहिली स्पर्धक जान्हवी किल्लेकर ठरली. घरात केलेली चुकीची वक्तव्य, वर्षा व पॅडीचा केलेला अपमान या सगळ्या गोष्टींसाठी शिक्षा म्हणून जान्हवीला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तसेच यापुढे तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर जागा नाही असं स्पष्ट शब्दांत रितेशने तिला सांगितलं होतं. तेव्हापासून जान्हवीच्या वागण्या-बोलण्यात बराच फरक पडला. तिने १ आठवडा संपूर्ण वेळ जेलमध्ये घालवत तिला दिलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या भागात जान्हवीला जेलमधून मुक्त केल्याचं पाहायला मिळालं. बाहेर येताच तिने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांची व ‘बिग बॉस’ची माफी मागितली. शिक्षा भोगून झाल्यावर आता रितेश देशमुख अभिनेत्रीला काय सांगतो याकडे सगळ्यांचं होतं. अर्थात, रितेशने जान्हवीच्या खेळाचं ( पाताळ लोक टास्क ) कौतुक केलंच परंतु, तिला भाऊच्या धक्क्यावर बसण्यास एपिसोडच्या सुरुवातीलाच मनाई करण्यात आली.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Bigg Boss 18 Shilpa shinde support to Digvijay singh rathee
Bigg Boss 18: ‘बिग बॉस ११’च्या विजेतीने दिग्विजय राठीला केलं समर्थन; शिल्पा शिरोडकरला म्हणाली…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : सूरजने केली अरबाजची नक्कल! तर, जान्हवी अन् डीपीने साकारली ‘ही’ पात्र; घरातला कल्ला पाहून नेटकरी म्हणाले…

रितेश देशमुख जान्हवीला काय म्हणाला?

रितेश सर्व सदस्यांकडे ‘जोडीचा मामला’ या टास्कबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात करणार असतो. एवढ्यात अभिनेता जान्हवीला पाहून बाहेर जाऊन बसण्यास सांगतो. रितेश म्हणतो, “जान्हवी मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाऊच्या धक्क्यावर बसू शकत नाही. त्यामुळे बाहेर चला…तुम्ही गार्डन एरियामध्ये जाऊन बसा.”

रितेशने आदेश दिल्यावर जान्हवी प्रचंड भावुक होऊन बाहेरची वाट धरते. रडत-रडत ती गार्डन परिसरात जाते. याठिकाणी एक खुर्ची व भाऊचा धक्का लाइव्ह पाहण्यासाठी टीव्हीची व्यवस्था आधीच केलेली असते. हा प्रसंग शनिवारच्या भागात घडला. यानंतर रविवारच्या ( १ सप्टेंबर ) भागात रितेशने सर्व सदस्यांना ‘जोडीचा मामला’ या टास्कमधून मुक्त केलं. तेव्हा देखील अभिनेत्याने जान्हवीला इतर सदस्यांपासून वेगळं खुर्चीवर बसण्यास सांगितलं. याचा अर्थ जेलमधून बाहेर आली असली, तरीही जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसू न देण्याची शिक्षा कायम ठेवली जाणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : …अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”

Bigg Boss Marathi Jahnavi Killekar
Bigg Boss Marathi Jahnavi Killekar ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

दरम्यान, आता येत्या आठवड्यात जेलमधून बाहेर आल्यावर जान्हवी घरात कशी वागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, शिक्षा झाल्याने ती गेल्या आठवड्यात जेलमध्ये बंद होती. त्यामुळे अभिनेत्रीला आठवडाभर स्वत:चा गेम दाखवता आलेला नाही. आता घरात ती कसं खेळणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Story img Loader