Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात मोठा संघर्ष करून आज त्याच्या वाट्याला हे एवढं मोठं यश आलं आहे. लहानपणीच आई-वडील गेल्याने त्याला कोणाचाही आधार नव्हता. बहिणीने त्याचा सांभाळ केला, शिक्षण देखील पूर्ण झालेलं नव्हतं. पण, सोशल मीडियाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आधी टिकटॉक आणि आता इन्स्टाग्राम रील्स बनवून सूरज घराघरांत लोकप्रिय झाला. सूरजने ट्रॉफीवर नाव कोरल्यावर रितशने त्याच्यासाठी एक खास गोष्ट केली आहे. नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत सूरजने याविषयी खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरज चव्हाण रितेश देशमुखचा खूप मोठा चाहता आहे. ट्रॉफी जिंकल्यावर त्याने रितेशला मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी, “तुम्ही या शोमध्ये यंदा आहात हे समजलं म्हणून मी होकार दिला” असं सूरज म्हणाला. याशिवाय आवडता अभिनेता व अभिनेत्री दोघंही रितेश-जिनिलीया असल्याचं सूरजने यावेळी सांगितलं.

हेही वाचा : Bigg Boss संपल्यावर निक्की-अरबाज एकत्र! शेअर केला पहिला सेल्फी; फोटो अन् कॅप्शन पाहून नेटकरी म्हणाले, “बाई…”

सूरजची दिवसाची कमाई टिकटॉक असताना ८० हजारांच्या घरात होती मात्र, सर्वांनी त्याची फसवणूक केली असं त्याने बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं. त्यामुळे सूरजसाठी रितेशने मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी विचारलं असता सूरज म्हणाला, “आता मला इथून पुढे स्वत:ला उभं राहायचंय आणि सर्वात महत्त्वाचं आता मला खचयाचं नाहीये. सगळ्या गोष्टी मला स्वत: करायच्या आहेत. रितेश सरांनी मला खूप मोठा सपोर्ट केलाय. त्यांनी मला त्यांच्या जवळचा एक पीए दिला. ते म्हणाले, तू काळजी घे स्वत:ची… आता सगळ्या गोष्टी समजून घे. मी एक माणूस देतो त्याच्या संपर्कात नेहमी राहा असं त्यांनी सांगितलंय.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi Video : सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंतने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, ‘बिग बॉस’ची ट्रॉफी ठेवली बाप्पाच्या चरणी

Bigg Boss Marathi रितेश देशमुख व सूरज चव्हाण

दरम्यान, सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’चा विजेता घोषित केल्यावर रितेशने खास सेल्फी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सूरजचं कौतुक केलं. यानंतर दोघांची बॅकस्टेजला देखील भेट झाली होती. याठिकाणी जिनिलीया सुद्धा उपस्थित होती. तिने देखील पोस्ट शेअर करत सूरजचं भरभरून कौतुक केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi riteish deshmukh gave special gift to suraj chavan after he lift the trophy sva 00