Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. घरात सध्या ग्रँड फिनालेच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच हा सीझन अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर गैरहजर होता. अभिनेता सलग २ आठवडे नसल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश गैरहजर राहणार असल्याने घरात पहिल्या आठवड्यात पत्रकार परिषद पार पडली होती. तर दुसऱ्या आठवड्यात अनिल थत्ते, राखी सावंत, अभिजीत बिचुकले आणि शरद उपाध्ये या चौघांनी घरात एन्ट्री घेऊन भाऊच्या धक्क्यावर उपस्थिती लावली होती. यावेळी या चौघा पाहुण्या सदस्यांनी घरातील अनेक स्पर्धकांना त्यांच्या खेळासंदर्भात आरसा दाखवण्याचं काम केलं. आता अखेर २ आठवड्यांनी खास महाअंतिम सोहळ्यानिमित्त रितेश पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर परतला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Grand Finale ची पहिली झलक! सूरज अन् अभिजीतचा ‘झापुक झुपूक’ म्हणत जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

ग्रँड फिनालेसाठी रितेश देशमुख सज्ज

रितेश देशमुख एवढे दिवस परदेशात ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. यानंतर काही दिवस त्याने आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवला. अखेर दोन आठवड्यांनी आता रितेश पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहिला आहे. ग्रँड फिनालेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) सेटवरील त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रितेश देशमुख यावेळी काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता. यावेळी अभिनेत्याने पापाराझींसमोर पोझ दिली. त्याच्या अनेक चाहत्यांनी रितेशबरोबर फोटोशूट देखील केलं. आता लवकरच या पर्वाचा विजेता कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Devara Box Office Collection : ज्युनियर एनटीआरच्या सिनेमाची पहिल्या आठवड्यात जबरदस्त कामगिरी, एकूण कलेक्शन तब्बल ‘इतके’ कोटी

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखचा डॅशिंग लूक

हेही वाचा : Bigg Boss Marathi चा विजेता कोण होणार? टॉप-६ पैकी आघाडीवर कोण? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

दरम्यान, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण या सहा स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनालेला चुरशीची लढत होणार आहे. आता यांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे ६ ऑक्टोबरला ( Bigg Boss Marathi ) म्हणजेच उद्या स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi riteish deshmukh grand finale comeback at bhaucha dhakka after 2 weeks sva 00