Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का नुकताच पार पडला. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले. यातला पहिला ट्विस्ट म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांना रितेशने ‘जोडीचा मामला’ या टास्कमधून मुक्त केलं आहे. याशिवाय एका टास्कदरम्यान रितेशने या सगळ्या सदस्यांना जोड्यांनी काही प्रश्न विचारले आणि उत्तर चुकलं, तर शॉक देण्यात येईल असं आधीच सांगितलं होतं. ठरल्याप्रमाणे, चुकीच्या उत्तरांसाठी सदस्यांना शॉक देण्यात आला. या शॉकमुळे अनेकांची अवस्था अगदी बघण्यासारखी झाली होती. यामुळे भाऊच्या धक्क्यावर एकच हशा पिकला होता. सगळं सुरळीत सुरू असताना वेळ झाली एलिमिनेशनची. या आठवड्यात व्होटिंग लाइन्स बंद असल्याने रितेश सदस्यांना काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.

घरात ( Bigg Boss Marathi ) आनंदाचं वातावरण असताना रितेशने सगळ्या सदस्यांना एक ट्विस्ट आणून धक्का द्यायचं ठरवलं. याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीने रविवारी दुपारीच शेअर केला होता. यामध्ये रितेश अंकिता एलिमिनेट झाल्याचं सांगत होता. हा केवळ प्रोमो असल्याने मूळ ट्विस्ट नेमका काय आहे हे प्रेक्षकांना प्रत्यक्ष लाइव्ह प्रसारित होणाऱ्या भागात पाहायला मिळालं. अंकिता एलिमिनेट होणार याचा प्रोमो पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तुमचा टेलर बारामतीचा दिसतोय”, धनंजयचं जॅकेट पाहून रितेशने घेतली फिरकी; म्हणाला, “बारामतीची स्टाईल…”

अंकिताची फिरकी घेण्यासाठी तिच्याबरोबर रितेशने एलिमिनेशनचा केवळ प्रँक केला. व्होटिंग लाइन्स आधीच बंद असल्याने अभिनेत्याने सर्व सदस्यांना फसवण्याचं ठरवलं. रितेशने अंकिताचा प्रवास संपला असं जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर झाले होते. डीपी, सूरज, अभिजीत हे सदस्य प्रचंड भावुक झाले होते. अखेर मुख्य प्रवेशद्वार उघडल्यावर अंकिता सेफ असल्याचं सर्वांना समजलं. दरवाजा उघडल्यावर डीपी जोरात ओरडून आनंद व्यक्त करू लागले. कारण, प्रवेशद्वाराबाहेर एका आरशाच्या खाली “इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा चांगलं खेळा. अपेक्षा आहेत…या आठवड्यात तुम्ही सेफ आहात.” असा संदेश लिहिण्यात आला होता. अंकिता सेफ झाल्याचं कळताच सर्वांनीच आनंद व्यक्त केला.

रितेश देशमुखने दिला महत्त्वाचा सल्ला

रितेश याबद्दल पुढे म्हणाला, “अंकिता त्या आरशात नीट बघा. तिथे काय लिहिलंय हे नक्की वाचा. कारण, हाच आहे भाऊचा धक्का! खरं सांगायचं झालं, तर या आठवड्यात तुम्ही चारही जण सेफ होतात कारण, व्होटिंग लाइन्स बंद होत्या. पण, तुम्हाला या नॉमिनेशनचं गांभीर्य कळावं म्हणून मी हा सगळा गेम केला. या आठवड्यात एक व्यक्ती सेफ झाला त्यामुळे पुढच्या आठवड्यात असंच होईल असं नाही. सगळ्या गोष्टी गांभीर्याने घ्या. आता फक्त १२ लोक उरली आहेत. त्यामुळे कॅप्टन्सी हलक्यात घेऊ नका. कॅप्टन्सीचा सर्वात मोठा फायदा हाच असतो की, ती व्यक्ती सेफ होते. आता येणारा आठवडा खूप कठीण असणार आहे. कारण, ‘बिग बॉस’ने आता येत्या आठवड्यात खूप कठीण प्लॅन्स बनवले आहेत. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : शाहरुख-काजोलच्या सुपरहिट गाण्यावर अभिजीत-निक्कीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “ती कशीही असो पण…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अंकिता सेफ झाल्यावर सगळे भावुक ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

दरम्यान, आता येत्या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होऊन घराचा ( Bigg Boss Marathi ) निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेलं. कारण, सोमवारच्या भागात थेट नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सर्वांना समोरासमोर एकमेकांना नॉमिनेट करण्याची संधी मिळणार आहे. आता यामध्ये घरातील सदस्य कोणाला टार्गेट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader