Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या भाऊच्या धक्क्यावर सध्या मोठा राडा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रितेश देशमुखने आजचा भाग चालू झाल्यावर सर्वात आधी जान्हवीची शाळा घेतली. गेल्या आठवड्यात जान्हवीने घरात केलेली भांडणं, चुकीची वक्तव्य याशिवाय पंढरीनाथच्या करिअरवर केलेली टीका यामुळे तिच्या विरोधात सर्वत्र नाराजी पसरली होती. नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीला बाहेर काढण्याची मागणी केली होती.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीला काय बोलणार याकडे गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण घराचं लक्ष लागलेलं होतं. अखेर नुकत्याच प्रसारित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने जान्हवीची जबरदस्त शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video: “तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं बंद होणार”, भडकलेल्या रितेश देशमुखने जान्हवीला काढलं घराबाहेर

जान्हवीने पॅडीच्या करिअरबद्दल केलेल्या वक्तव्यावर रितेशने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. वर्षा मॅडम आणि पॅडी या गोष्टी ऐकण्यासाठी घरात आलेले नाहीत असं रितेशने सांगितलं. तसेच “जान्हवी तुम्ही ‘बिग बॉस’ मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही या सगळ्यांना म्हणता ना, ए मी बाहेर काढेन. तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढतो. दरवाजा उघडा…तुम्ही यापुढे भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही. इथे तुमची जागा नाही तुमची जागा बाहेर” असं सांगत रितेशने थेट जान्हवीला जेलमध्ये टाकलं आहे.

Bigg Boss Marathi : जान्हवीला टाकलं जेलमध्ये…

जान्हवीने घरात ( Bigg Boss Marathi ) केलेल्या वागणुकीबद्दल रितेशने तिला मोठी शिक्षा दिली आहे. गार्डन एरियामध्ये यासाठी खास जेल उभारण्यात आलं आहे. यंदाच्या आठवड्यात जान्हवी जेलमध्ये जाणारी पहिली स्पर्धक आहे. आता पुढच्या आठवड्यापर्यंत जान्हवीला या जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. राहणं, झोपणं, जेवण सगळं काही जान्हवीला जेलमध्ये दिलं जाणार आहे.

हेही वाचा : “बाईई…नुसता तोंडाचा पट्टा चालू”, सुरेखा कुडची निक्कीवर भडकल्या! म्हणाल्या, “महाराष्ट्र भाऊच्या धक्क्याची…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

दरम्यान, जान्हवीला आता खरंच आठवडाभर शिक्षा होणार की, तिला माफ करण्यात येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय भाऊच्या धक्क्यावर वैभव, अरबाज, निक्की या सगळ्यांची रितेशने ( Bigg Boss Marathi ) कानउघडणी केली आहे.

Story img Loader