Bigg Boss Marathi Winner Selfie : ‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचव्या सीझनची सांगता झालेली आहे. यंदा पहिल्यांदाच या शोने अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रितेश भाऊच्या धक्क्यावर आला नव्हता. त्यामुळे ग्रँड फिनालेला तरी अभिनेता येणार की नाही याबद्दल प्रेक्षकांच्या मनात साशंकता निर्माण झाली होती.
अखेर भाऊच्या धक्क्यावर ( Bigg Boss Marathi ) रितेशला पाहून सर्वजण आनंदी झाले. गेल्या दोन आठवड्यांपासून रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे त्याने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे. रितेश म्हणाला, “हा शो माझ्या खूप जवळचा आहे आणि मला सर्वांनी दोन आठवडे समजून घेतलं यासाठी खूप खूप आभार आणि मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो. आता मी शूटिंग थांबवून खास आजच्या सोहळ्यासाठी इथे आलो आहे.”
हेही वाचा : Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!
रितेशने यानंतर संपूर्ण ग्रँड फिनाले दमदारपणे होस्ट केला. शेवटी टॉप-२ म्हणून मंचावर सूरज आणि अभिजीत उपस्थित होते. रितेशने काही वेळ दोघांची फिरकी घेतली आणि शेवटी विजेता म्हणून सूरजचं नाव घोषित केलं.
सूरज विजेता झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. तर, त्याच्या लाखो चाहत्यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण, सूरजने पहिला सेल्फी रितेश देशमुखबरोबर काढला. याचा खास फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”
रितेशचा सूरजबरोबर खास फोटो
रितेशने “बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण आणि रनर अप अभिजीत सावंत” असं कॅप्शन देत खास पोस्ट शेअर केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.