Bigg Boss Marathi 5 New Promo: ‘बिग बॉस मराठी ५’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. आठवडाभर घरात होणारे टास्क, भांडणं, स्पर्धकांची एकमेकांवर चिखलफेक आणि त्यानंतर वीकेंडला होणारा भाऊचा धक्का याबाबत प्रेक्षक खूप उत्सुक असतात. या आठवड्यातही बिग बॉसच्या घरात बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याबद्दल आज भाऊच्या धक्क्यामध्ये काय घडणार, रितेश कुणाला सुनावणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच भाऊचा धक्काचा नवीन प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसच्या या पर्वातील सर्वात स्ट्राँग सदस्यापैकी एक अरबाज पटेल समजला जात होता, पण अरबाज ज्याप्रमाणे निक्की म्हणेल तेच ऐकतो, तिची कामं करतो ते सगळं पाहून रितेश देशमुख भडकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलर्स मराठीने ‘भाऊचा धक्का’चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये होस्ट रितेश देशमुख अरबाज पटेलला खडे बोल सुनावताना दिसत आहे. त्याने अरबाजच्या गेमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रितेश अरबाजबद्दल एक प्रश्न विचारतो त्यावर घरातील सर्व सदस्य सहमती दर्शवतात.

Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”

प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख म्हणाला, “अरबाज, स्ट्राँग प्लेयर ही जी इमेज तुम्ही तयार केली होती ना, ती मातीत मिळवली आहे.” अरबाज म्हणतो, “मी काळजी घेतोय कुणाची तरी.” मग रितेश म्हणतो, “तुम्हाला समजत नाहीये? तुम्ही काळजी घेता असं तुम्हाला वाटतं?” यावर अरबाज हो म्हणाला. मग रितेशने घरातील इतर स्पर्धकांना विचारलं की इथे कुणाला वाटतं, “अरबाज निक्कीचा डोअरमॅट (पायपुसणी) होऊन पायापुढे येत होता?” रितेशने असं विचारल्यावर घरातील सर्वच सदस्यांनी हात वर केले. यानंतर अरबाज स्पष्टीकरण द्यायला जातो पण रितेश त्याला थांबवतो आणि म्हणतो, “एक मिनिट मी बोलतोय आता.”

Bigg Boss Marathi: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची नवीन पोस्ट; म्हणाली, “तो आणि निक्की…”

पाहा प्रोमो-

दरम्यान हा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये आजच्या भाऊच्या धक्क्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. निक्कीच्या एका वक्तव्यामुळे रितेशने या सीझनमध्ये कॅप्टन होऊ शकणार नसल्याची शिक्षा दिली आहे. त्यातच आता अरबाज ज्याप्रमाणे निक्कीबरोबर राहून गेम खेळतोय ते पाहून त्याला आरसा दाखवला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi riteish deshmukh slammed arbaz patel over nikki calls doormat promo viral hrc