Bigg Boss Marathi : रितेश देशमुखने या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर घरात चुकीचं वागणाऱ्या सगळ्याच सदस्यांना खडसावलं आहे. सर्वप्रथम अभिनेत्याने जान्हवीची जबरदस्त शाळा घेतल्याचं पाहायला मिळालं. रितेशने भाऊचा धक्का सुरू होताच जान्हवीला तिने पॅडीच्या केलेल्या अपमानाबद्दल जाब विचारला. यावेळी जान्हवी पूर्णवेळ मान खाली घालून बसली होती. कालांतराने अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते.

जान्हवीने घरात केलेलं वर्तन, पॅडीचा अपमान या सगळ्याची शिक्षा म्हणून रितेश देशमुखने तिला घराबाहेर काढत जेलमध्ये टाकलं आहे. ‘बिग बॉस’च्या गार्डन परिसरात हा जेल ठेवण्यात आला आहे. जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही असं सांगत रितेशने घराबाहेरचा रस्ता दाखवल्यावर ती प्रचंड रडायला लागते. यावर रितेश, “तिने चुकीचं वागण्यापूर्वी या सगळ्याचा विचार करायला हवा होता” असं सांगतो. यानंतर जान्हवीला बाहेर जेलमध्ये बंद करून सगळे सदस्य आत येतात आणि पुढे रितेश निक्की, अरबाज व वैभवची शाळा घेण्यास सुरुवात करतो.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video: “तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं बंद होणार”, भडकलेल्या रितेश देशमुखने जान्हवीला काढलं घराबाहेर

रितेश भाऊच्या धक्क्यावर बोलत असताना यापूर्वी अनेकदा अरबाजकडून मध्येच कमेंट्स करण्यात आल्या होत्या. तर, काही सदस्य मान खाली करून गालातल्या गालात हसत असल्याचं रितेशच्या निदर्शनात आलं होतं. त्यामुळे असं वागणाऱ्या अरबाज, निक्की आणि जान्हवीला रितेशने चांगलंच सुनावलं आहे. एवढंच नव्हे तर अरबाजला सक्त ताकीद दिली आहे.

रितेश म्हणतो, “गेल्यावेळी मी जेव्हा भाऊच्या धक्क्यावर बोलत होतो. तेव्हा निक्की, जान्हवी, अरबाज हे लोक… मी बोलत असतानाच कधी कोणाच्या चेहऱ्यावर हास्य, कोणाचे डोळे इकडे-तिकडे फिरायचे. मी बोलत असताना अरबाज तुमच्या मध्येच दोन-तीन कमेंट्स होत्या.” यानंतर अरबाज मान खाली घालतो. हे पाहून रितेश पुढे म्हणतो, “अरबाज…वर बघा…माझ्याकडे बघत राहा… मी रितेश देशमुख आहे! त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवीला टाकलं जेलमध्ये! “तुमची जागा बाहेर”, म्हणत रितेश देशमुखने केली मोठी शिक्षा; संतापून म्हणाला, “यापुढे…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “बाईई…नुसता तोंडाचा पट्टा चालू”, सुरेखा कुडची निक्कीवर भडकल्या! म्हणाल्या, “महाराष्ट्र भाऊच्या धक्क्याची…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरातून बेघर होण्यासाठी यंदा अभिजीत सावंत, इरिना, आर्या जाधव आणि वैभव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader