Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. तिसऱ्या आठवड्यात वैभवने “मालवणी ही मराठी भाषा नाहीये” असा दावा करत अंकिताचे बाहुल्यांच्या टास्कदरम्यान पॉईंट्स कापले होते. यानंतर सोशल मीडियावर वैभव विरोधात संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. यासंदर्भात रितेशने भाऊच्या धक्क्यावर त्याची चांगलीच कानउघडणी करत जाब विचारला आहे.

रितेश अंकिताला विचारतो, “तुम्ही कोणत्या गावच्या?” यावर ती म्हणते, “मी मालवणची आहे… सिंधुदुर्गात येतं.” अंकिताचं म्हणणं ऐकून रितेश तिला सांगतो, “तुम्ही जी भाषा बोलता ती माका कळता, माका काय…महाराष्ट्राक कळता कारण, मालवणी पण मराठीच आसा! काय वैभव मी काय म्हणतोय आता तुम्हाला समजलं असेलच.”

Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
bigg boss marathi nikki tamboli statement on varsha usgaonker motherhood
“वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य?”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मोठा वाद; माफी मागूनही नेटकरी संतापले…
riteish deshmukh angry reaction on nikki motherhood statement
“एक स्त्री असून वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य…”, निक्कीवर रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “सॉरी हृदयातून आलं पाहिजे”
Lakhat Ek Aamcha dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील मासिक पाळीचा सीन बघून नेटकरी म्हणाले, “असे विषय…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi- “एक स्त्री असून वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य…”, निक्कीवर रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “सॉरी हृदयातून आलं पाहिजे”

रितेश देशमुखने वैभवला झापलं

रितेश वैभवला मालवणी भाषेवरून केलेल्या वक्तव्याबद्दल म्हणतो, “टास्कमधल्या एका शुल्लक पॉईंटसाठी तुम्ही मालवणी भाषा ही मराठी भाषा नाहीये…असं का म्हणालात? वैभव तुम्ही हे वाक्य बोललात त्या क्षणी प्रेक्षकांच्या नजरेतून उतरलात. टास्क जिंकण्याच्या नादात तुम्ही वाटेल ते बोलता आणि याचे परिणाम काय होतील याचा विचारही करत नाही. ‘मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही’ हे बोलून तुम्ही फक्त मालवणी लोकांची नाहीतर सगळ्याच मराठी माणसांची मनं दुखावली आहेत.”

“महाराष्ट्रात प्रत्येक ८ ते १० मैलावर भाषा बदलते याचा अर्थ या भाषा मराठी नाहीत असा होत नाही. या सगळ्या मराठीच्या उपभाषा आणि आपल्या बोलीभाषा आहेत. भाषेचं काम आहे माणसांना जोडून ठेवणं…आज मालवणी मराठी भाषा नाही म्हणालात, उद्या म्हणाल कोल्हापूरची भाषा मराठी नाहीये. एकीकडे तुम्ही इरिनाला मराठी शिकवता आणि दुसरीकडे मराठी भाषेबद्दल असं वक्तव्य करता हे तुम्हाला शोभत नाही.” असं सांगत रितेशने वैभवची कानउघडणी केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 मधील ‘या’ स्पर्धकाचं कास्टिंग चुकीचं, आधीच्या पर्वातील अभिनेत्री म्हणाली, “महाराष्ट्रातील…”

bigg boss marathi
Bigg Boss Marathi : रितेश देशमुख ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

“मालवणी भाषा मराठी नाही असं तुम्हाला का वाटलं? हे वक्तव्य तुम्ही कसं काय केलंत? कारण, तुम्हाला अंकिताची मराठी समजली नाही, मग तुम्हाला इरिनाची मराठी कशी काय समजते?” असा प्रश्न रितेश वैभवला विचारतो. यावर वैभवने “मला कधी-कधी इरिनाची मराठी भाषा समजून घेण्यास देखील त्रास होतो…माझं असं काहीच मनात नव्हतं.” असं सांगत अंकिताची व समस्त महाराष्ट्रातील मालवणी प्रेक्षकांची माफी मागितली.