Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील काही स्पर्धक सतत दिग्गज कलाकारांचा अपमान करताना दिसत आहेत. कधी वर्षा उसगांवकर तर कधी पंढरीनाथ कांबळेचा अपमान केला जात आहे. अलीकडेच जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथचा अभिनयावरून अपमान केला. यावरून मराठी कलाकार संतापले असून जान्हवीचा निषेध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस’च्या दुसरा पर्वाचा विजेता शिव ठाकरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

शिव ठाकरे इन्स्टाग्राम स्टोरीवर आपलं मत मांडलं आहे. त्याने लिहिलं आहे, “आपल्याला फक्त मराठी बोलता येते म्हणजे आपण मराठी नाही होत…आपले ते मराठी संस्कार आहे ह्या मातीतले जे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई-वडिलांकडून लहानपणापासून घेतलेले आहेत; या गोष्टीचा मला अभिमान आहे. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये एक सदस्य/स्पर्धक म्हणून जातो. तेव्हा तुम्ही जिंकून नाही आला तरी चालतं, पण एक माणूस म्हणून जरी बाहेर आलात तरी तुम्ही जिंकलात…आणि जर तुम्ही हे नाही करू शकलात तर तुम्हाला नाही माहिती की यामुळे तुमचे किती वर्षांची मेहनत वाया जाते…आणि राहिली गोष्ट पॅडी दादा, वर्षा मॅम यांसारख्या कलाकारांबद्दल आपण ‘बिग बॉस’ला धन्यवाद म्हणायला पाहिजे की अशा कलाकारांचा सहवास आपल्याला भेटतो. रंगभूमीवर जेव्हा हे उभे असतात तेव्हा आपण त्यांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू नाही शकत.” ( Bigg Boss Marathi )

When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

हेही वाचा – Video: “मगरमच्छ के आंसू…”, जान्हवीने रडत पंढरीनाथ कांबळेची माफी मागितल्यावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

पुढे शिवने लिहिलं आहे, “अभिनयाने रंगभूमी गाजवलेल्या एका कलाकारावर अशा प्रकारची टिप्पणी करतो तेव्हा ते खेदजनक वाटतं. फक्त थोड्याशा लाईक कमेंट आणि चर्चेत असावं म्हणून अशा गोष्टी करणे पटत नाही…समोरच्यांची इज्जत करा…न की ते मोठे आहेत म्हणून, यासाठी करा की तुम्हाला तसे घरून संस्कार दिलेले आहेत.. जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया… #bbmarathi5”

Bigg Boss Marathi Season 2 Winner Shiv Thakare Post
Bigg Boss Marathi Season 2 Winner Shiv Thakare Post

हेही वाचा – “तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok…”, जान्हवीने रडून माफी मागितल्यावर विशाखा सुभेदारने सुनावलं! म्हणाली, “पंढरीनाथ…”

जान्हवीने ढसाढसा रडत पंढरीनाथ कांबळेची मागितली माफी

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) २१ ऑगस्टच्या भागात जान्हवीने ढसाढसा रडत पंढरीनाथ कांबळेची माफी मागितली. जान्हवी हात जोडून म्हणाली, “माझं खरंच चुकलं…सॉरी” यावेळी पंढरीनाथने तिला मोठ्या मनाने माफ केलं. पंढरीनाथ तिला समजवत म्हणाला, “मी देवाकडे प्रार्थना केली होती की, देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टॅण्ड घेता यावा की, या माणसाबरोबर मी काम करणार नाही. कारण, मी हे करू शकतो. मी विचारेन कोण-कोण आहे जान्हवी किल्लेकर आहे ना? बॉस मी काम नाही करणार, असं मी ठरवलं होतं. पण, मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे. तर, झालं गेलं राहुदेत त्यामुळे ठिके आता तू रडू नकोस.” पण जान्हवीचं हे माफी मागणं नाटक असल्याचं मराठी कलाकार म्हणत आहेत.

Story img Loader