‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. घरात आता मोजकेच सदस्य उरले आहेत. काही दिवसांनंतर या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडेल. पण त्याचपूर्वी हा आठवडा घरातील सदस्यांसाठी फॅमिली विक असणार आहे. म्हणजेच सदस्यांना त्यांच्या घरातील मंडळी भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – गरोदरपणातच नवऱ्याने आईला करिश्मा कपूरच्या कानाखाली मारण्यास सांगितली, अभिनेत्रीही मागे हटली नाही अन्…

कलर्स मराठी वाहिनीने यादरम्यानचचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा नेमळेकरची आई तर किरण मानेंच्या कुटुंबातील व्यक्तीनेही घरामध्ये प्रवेश केला असल्याचं दिसत आहे.

त्याचबरोबरीने अमृता धोंगडेचे आई व वडील तिला भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आले आहेत. आई-वडिलांना पाहून अमृता त्यांना मिठी मारुन ढसाढसा रडू लागते. अमृताचे वडील तिला म्हणतात, “रडायचं नाही आता लढायचं आहे.”
तर अमृताची आईही आपल्या लेकीला पाहून भावूक होते. अमृताची आई म्हणते, “सगळे म्हणतात तुमची मुलगी खंबीर आहे. ती ट्रॉफी मिळवणारच.” अमृताच्या आई-वडिलांना तिचा किती अभिमान आहे हे या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 4 amruta dhongade meet her parents in house emotional video goes viral on social media kmd