‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सहभागी झाली. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच तिने घरात राडा करण्यास सुरुवात केली. विकास सावंत, किरण माने, अमृता धोंगडे सारख्या सदस्यांशीही तिचं भांडण झालं. सध्या ती या शोमुळे चर्चेत आहे. पण त्याचबरोबरीने अपूर्वा तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. अपूर्वा सध्यातरी सिंगल आहे. पण यावेळी तिने ‘बिग बॉस’च्या घरात एक इच्छा बोलून दाखवली.
आणखी वाचा – Video : ‘मला पिरतीच्या झुल्यात…’ बायकोसमोर चक्क राणादाने लावणीवर धरला ठेका, उपस्थितही बघतच बसले अन्…
राखी सावंतने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर अनेक वाद रंगले. आता अपूर्वासह अमृता देशमुख किचनमध्ये काम करत असताना राखी त्यांच्याशी गप्पा मारत असते. यावेळी अपूर्वा मी सिंगल आहे असं म्हणते. तर अमृताही मी सिंगल असल्याचं यावेळी सांगते. यावेळी अमृता सिंगल आहे हे अपूर्वा मान्यच करत नाही.
यावेळी अमृता म्हणते, “बाहेर जाऊन बघ माझ्यासाठी मुलांचा दुष्काळ आहे. पण शेवंता शेवंता करणारे खूप जणं आहेत.” यावर अपूर्वा म्हणते, “शेवंता शेवंता करणारे आहेत. पण माझ्या आयुष्यात कोणी नाहीच.” या दोघींचं बोलणं ऐकून राखी म्हणते, “अगं अमृता तुझं स्वयंवर आहे. तुला लग्नासाठी मुलगा पाहिजे ना…” यावर अपूर्वा माझं स्वयंवर का नाही? असा राखीला प्रश्न विचारते.
आणखी वाचा – Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
अपूर्वा राखीला म्हणते, “कलर्स वाहिनीला सांग माझं स्वयंवर करायला.” यावर अमृता म्हणते, “आधी माझं स्वयंवर. मी लग्नासाठी एक मुलगा निवडते. दुसरा मुलगा जो असेल त्याची निवड तू कर.” यावर अपूर्वा म्हणते, “नवरा म्हणजे भाजीपाला आहे का हा नाहीतर तो घे. नवरा विकते ही उभ्या उभ्या.” पण अपूर्वाने यावेळी तिला स्वयंवर करायची इच्छा बोलून दाखवली. तसेच ती सिंगल असल्याचंही म्हटलं आहे.