‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामधील सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाचे घरातील सदस्यांबरोबर असलेले वाद तर प्रचंड गाजतात. अनेकदा तिने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. गेल्या पाच वर्षामध्ये खूप काही सहन केलं असल्याचं अपूर्वा या शोमध्ये बोलताना दिसते. याचबाबत आता तिची जवळची मैत्रीण सायलीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.
सध्या युएसला असणारी अपूर्वाची मैत्रीण सायली हिने ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी अपूर्वाच्या खासगी आयुष्याबाबत तिने भाष्य केलं. सायली म्हणाली, “सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येत असतात. तिच्या वडिलांचंही मध्यंतरी निधन झालं. यावेळी अपूर्वाला खूप मोठा धक्का बसला. एकामागो माग एक घटना घडल्यानंतर काय परिस्थिती होते हे आपण स्वतः अनुभवल्या शिवाय कळत नाही.”
“गेल्या पाच वर्षांमध्ये अपूर्वाच्या आयुष्यामध्ये काय घडलं हे तिच्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त कोणालाचा माहित नाही. आयुष्यात एखादी अशी गोष्ट घडते जेव्हा आपण ताकही फुंकून पितो असंच काहीसं अपूर्वाचं आहे. ती सहसा कोणाला तिच्या आयुष्यामध्ये येऊ देत नाही.”
आणखी वाचा – Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न
इतकंच नव्हे तर सायलीने अपूर्वाला एक सल्ला दिला आहे. अक्षय व विकासपासून अपूर्वाने लांब राहावं असं सायलीचं मत आहे. अपूर्वाचा काही वर्षांपूर्वा घटस्फोटही झाला. सध्यातरी लग्नासाठी मुलगा शोधत असल्याचं अपूर्वाने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये म्हटलं होतं