यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात असलेले अभिनेते किरण माने हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ते फेसबुकवर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. बिग बॉसच्या घरात ‘साताऱ्याचा वाघ’ अशी ओळख असलेले किरण माने हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्यांदाच फोन बुथ तयार करण्यात आला आहे. या फोन बुथमध्ये गाणं वाजल्यानंतर घरातील एका सदस्यला तिकडे जाऊन कुटुंबियांशी संवाद साधता येतो. यावेळी किरण माने यांनी त्या फोन बुथमध्ये जाऊन संवाद साधला. यात ते त्यांची पत्नी ललिता हिच्याशी संवाद साधताना पाहायला मिळाले. त्यावेळी ते फारच भावूक झाले.
आणखी वाचा : “अब्रूची लक्तरं टांगली गेली, पण…” किरण माने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

किरण मानेंचे संभाषण

“हॅलो ललिता, मला तुझी खूप आठवण येतेय. तुम्हाला माहिती आहे की गेल्या सहा महिन्यात आपले कुटुंब ज्या दु:खातून, ज्या वेदनेतून गेले आहे, आपण ज्या परिस्थितीतून बाहेर पडत होतो. त्यावेळी मला ही ऑफर आली आणि आपण ते करायचं ठरवलं. मी इथे आल्यानंतर मला एकच होतं की माझ्या बायकोचा हा सर्वात आवडता शो आहे आणि त्या शो मध्ये आपण जाणं हे तू कधी स्वप्नही बघितलं नसशील. इथे आलोय, लढतोय, मला तुमची रोज आठवण येते. मी पहिल्यांदा असं ठरवलं होतं की एकही टास्क खेळणार नाही. जोपर्यंत प्रेक्षक ठेवतील तोपर्यंत राहायचं, कारण आता या वयात हात-पाय मोडून घेणं, परवडणारं नाही. आई-दादांची जबाबदारी माझ्यावर आहे, जमणार नाही. पण जमलं यार आता तुम्हाला अभिमान वाटेल असं खेळतोय.

सिसॉच्या टास्कमध्ये तो खेळताना तर फक्त आपलं कुटुंब माझ्या डोळ्यासमोर येत होतं. जर विक्या उठला नसता ना तर जीव गेला तरी उठलो नसतो. सर्वात मोठा टास्क आहे तो बिग बॉसमधला. हा टास्क मी जिंकणारच. सर्व पोरं माझ्यासाठी सारखी आहेत. मला कोणाविषयी राग नाही. मी इथे जे काही म्हणतो ती इथल्यापुरती म्हणतो. हे तू लक्षात घे. विक्याशीही भांडतो ते तेवढ्यापुरतं असतं. तो माझा चांगला मित्र असेल. माझ्या मुलाच्या वयाची पोर आहेत ही. माझे इथे अपमान होतो. पण तुम्ही घाबरु नका. मी लढेन. मी सर्व गोष्टींच्या विरोधात उभा राहतो. मी कशामुळे खचणार नाही. पण तुमचे चेहरे पडले तर मात्र मी खचून जाईन. मला तुमची आठवण येते. दादांची काळजी घे, त्यांना वेळच्या वेळी चेकअपसाठी नेत जा”, असे किरण माने भावूक होत म्हणाले.

आणखी वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूप्रकरणी तक्रार दाखल, दुचाकीवरुन घरी जाताना ट्रॅक्टरने दिली धडक

दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात पाऊल ठेवल्यापासून सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे बिग बॉसचा कार्यक्रम दिवसेंदिवस मजेशीर होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 4 kiran mane emotional after speak with wife nrp