बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासूनच भांडण, राडे पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील दोन सदस्य आतापर्यंत बाहेर पडले आहेत. प्रसाद जवादेनंतर नुकतचं अभिनेत्री मेघा घाडगेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण माने, अमृता देशमुख आणि मेघा घाडगे या तीन स्पर्धकांच्या नावाचा समावेश होता. त्यात मेघाला कमी मत मिळाली, त्यामुळे ती घराबाहेर पडली. यानंतर तिने बिग बॉसच्या इतर स्पर्धकांना किरण मानेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मेघा घाडगेने किरण मानेच नाही तर योगेश जाधवबद्दलही अनेक खुलासे केले. यावेळी तिने योगेश तिला बिग बॉसच्या घरात काय काय बोलायचा याबद्दल तिने भाष्य केले. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मेघाने याबद्दल वक्तव्य केले.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

ताई मला १ लाख रूपये द्या

“योगेशचा पहिल्या दिवसापासून त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. मी त्याला वेळोवेळी सावध केलं आहे. तू जे बोलतोस ते सगळंच मी ऐकून घेऊ शकत नाही. तू थोडं तोंड साभाळून बोलत जा. कारण तू जे बोलतोस ते मनाला लागतं. हे मी त्याला बिग बॉसच्या घरात म्हटले. पण तो काय बोलला हे दाखवलंच गेलं नाही. ज्यामुळे मी दुखावली गेले. त्यामुळे मी त्याला बोलले. पण त्या गोष्टीच दाखवण्यात आल्याच नाहीत.

योगेश दरवेळी पैशाच्या स्वरुपात गोष्टी मोजायचा. दरवेळी ताई पैसे पाहिजेत का? नाचून दाखवता का? हे बरोबर होतं का? ताई मी पैसे देतो हे करून दाखवणार का? तो मला असंही म्हणाला होता की, ताई मला १ लाख रूपये द्या मी तुमच्याबद्दल चांगलं बोलतो, हे सतत चालू असायचं. त्याचा त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही, असे मेघा घाडगे म्हणाली.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून मेघा घाडगे बाहेर, सदस्यांना दिला मोलाचा सल्ला

“एकदा मी जेवण करत असताना त्याला भूक लागली होती. त्यावेळी मी त्याला अजून जेवण तयार नाही असे म्हटलं होतं. तेव्हा तो मला भूक ना मग कुत्र्यासारखं, असं म्हणाला होता. ही त्याची भाषा होती. मला या गोष्टींचा प्रचंड त्रास व्हायचा. त्याला त्याच्या रागावर नियंत्रण करता येत नव्हते. त्याला उकसवलं की उकसायचा. तो खूप लोकांना तो बापावरुन बोलला होता. सतत एखाद्याला बापावरुन बोलणं योग्य नाही. याबद्दल त्याला महेश मांजरेकरांनीही ताकीद दिली होती. पण तरीही तो तेच करत होता”, असे मेघा घाडगेने म्हटले.