छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणून बिग बॉस या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व होऊन महिना उलटला आहे. मात्र पहिल्या दिवसापासूनच या कार्यक्रमात गॉसिप, भांडण आणि राडे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवसांपासून या शो ची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. पण यंदा बिग बॉसचे पर्व चर्चेत असण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.

अपूर्वा नेमळेकरने या घरात एंट्री केल्यापासूनच टीममध्ये काम करणे, आरडाओरड करणे या गोष्टींना सुरुवात केली आहे. तसेच ती कायमच लीडरशीपच्या भूमिकेत पाहायला मिळते. अनेकदा तिचे सदस्यांबरोबर खटके उडवताना दिसत आहेत. तिच्या या गेममुळे अनेकजण तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Jos Buttler Creates History in T20I Scored Most Runs in India by Visiting Batter 556 Runs IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरची ऐतिहासिक कामगिरी, भारतात टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Forest Minister Ganesh Naik Challenges
लोकजागर : नाईकांसमोरचे आव्हान!
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदेंची गरज संपली, आता नवा उदय पुढे येणार”, वडेट्टीवारांचा मोठा दावा; म्हणाले, “दोन्ही बाजूला…”

नुकतंच अपूर्वा नेमळेकरच्या बिग बॉसमधील खेळाबद्दल अभिनेते माधव अभ्यंकर यांनी भाष्य केले आहे. एका मुलाखतीत त्यांना अपूर्वा नेमळेकरच्या खेळाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मी तो कार्यक्रम बघतच नाही. त्यामुळे त्यात मत व्यक्त करणे मला तरी गरजेचे वाटत नाही.”

“कारण जर मी तो कार्यक्रम बघितला असता तर मी त्यावर काही तरी वक्तव्य केले असते. मला त्याबद्दल काहाही माहिती नाही. खरं सागायचं तर मी सध्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. मी आताही वेळात वेळ काढून आलोय या ठिकाणी आलो आहे. त्यामुळ मला याबद्दल काहीही माहिती नाही. म्हणून मी यावर काहीही भाष्य करणार नाही”, असेही माधव अभ्यंकर यांनी सांगितले.

आणखी वाचा : “बदनाम करायला एक क्षणही लागत नाही, पण…” मेघा घाडगेचे स्पष्ट शब्दात उत्तर

दरम्यान अपूर्वा नेमळेकरने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. तिच्या या पात्रामुळे अल्पावधीतच ती प्रसिद्ध झाली. या मालिकेत अभिनेते माधव अभ्यंकर यांनी अण्णा नाईक हे पात्र साकारले होते. त्यांचे हे पात्र आजही चर्चेत असते. या मालिकेमुळे ते दोघेही आजही प्रसिद्धीझोतात असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader