छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. बिग बॉस मराठीला सुरुवात होताच सदस्यांमध्ये होणारे राडे, भांडण, गॉसिप पाहायला मिळाले. यंदाचं पर्व हे ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अनेक चर्चेत असलेले कलाकार सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. यातील अभिनेत्री मेघा घाडगे हिने बिग बॉस या कार्यक्रमावर अनेक आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉस या कार्यक्रमात तिसऱ्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क चांगलाच गाजला. या टास्कदरम्यान मेघा आणि योगेशची कडाक्याची भांडण पाहायला मिळाली. यानंतर मेघाला कमी मत पडल्याने त्यांना घराबाहेर जावं लागलं. यानंतर नुकतंच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मेघाने बिग बॉस या कार्यक्रमावर अनेक आरोप केले आहेत. यावेळी तिने माझी बाजू दाखवली गेली नाही, असा आरोप केला आहे.
आणखी वाचा : “ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप

मेघा घाडगे काय म्हणाली?

“मी अशापद्धतीने बाहेर येईन याचा कधी विचारच केला नव्हता. हे सर्व फार धक्कादायक होतं. मी बाहेर कशी पडली याचा अजूनही मला प्रश्न आहे. का घडलं, कसं घडलं याबद्दल अजूनही माझ्या मनात शंका आहेत. त्यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. ते कसं दाखवलं गेलं, ते कसं प्रक्षेपित करण्यात आलं, याबद्दल अजूनही मला अर्धवट आहे.

कारण माझे अनेक भाग अजून बघायचे बाकी आहेत. जे एक दोन एपिसोड बघितले आहेत. लोकांसमोर ज्या गोष्टी येतात, त्या फार भयानक आहे. त्यात फक्त एकच बाजू दाखवली गेली, याचं मला फार वाईट वाटतंय. लोकांनी त्यावर विश्वास ठेवला याचंही मला वाईट वाटतंय”, असे मेघाने म्हटलं.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून मेघा घाडगे बाहेर, सदस्यांना दिला मोलाचा सल्ला

“सोशल मीडिया किंवा मुलाखत या माध्यमातून मला माझी बाजू मांडता येणार आहे. मी कोणत्याही गोष्टी नाकारत नाही. पण क्रियेवर प्रतिक्रिया असते हे सर्वांनाचा माहिती आहे. अरे केल्यावर का रे हे येतं. का रे लोकांना कळलं पण अ रे कुठून आलं हे लोकांना कळलंच नाही. बिग बॉसच्या घरात झालेल्या अर्ध्याहून अधिक गोष्टी टीव्हीवर दाखण्यातच आलेल्या नाहीत, असे मेघा घाडगे म्हणाली.”

दरम्यान यापूर्वी अपूर्वा नेमळेकरनेही महेश मांजरेकरांबरोबरच्या वादात याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर अपूर्वाला ओरडत असताना तिनेदेखील हा मुद्दा उपस्थित केला होता. बाहेर टीव्हीवर काय दाखवलं जातंय याबद्दल मला कल्पना नाही, असे ती म्हणाली होती. यामुळे बिग बॉसच्या घरात सुरु असलेल्या अनेक गोष्टी टीव्हीवर दाखवल्या जातात की नाही, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 4 megha ghadge shocking allegation said my side was not shown nrp