‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये काही दिवसांपूर्वीच ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री झाली. त्यानंतर घरामध्ये नवीन वाद, राडे सुरू झाले. राखीच्या डायलॉग बाजीने तर प्रेक्षकांना हसू अनावर झालं. आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती घरातील सदस्य प्रसाद जवादेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.
कलर्स मराठी वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद गार्डन एरियामध्ये घरातील इतर सदस्यांबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. याचदरम्यान तिथे राखी येते. थेट त्याच्या मांडीवर पडते. पण प्रसादला हे काही सहन होत नाही.
प्रसादच्या मांडीवर राखी पडते हे पाहून प्रसाद तिला उचलतो आणि बाजूला ठेवतो. प्रसाद म्हणतो “तुझ्या पाया पडतो पण मला माफ कर.” राखीचं हे वागणं पाहून इतर सदस्य प्रसादची फिरकी घेतात. पण प्रसाद मात्र राखीपासून लांब पळतो.
आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…
घरातील सदस्या राखीचा ड्रामा पाहून पोट धरून हसू लागतात. प्रेक्षकांनीही हा व्हि़डीओ पाहिल्यानंतर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. कलर्स मराठी वाहिनीने व्हिडीओ शेअर केल्यानंतर प्रेक्षकांना हसू अनावर झालं आहे.