लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे प्रोग्रामिंग हेड असलेल्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर अलीकडेच दोन नव्या मालिका आणि एक विनोदी कार्यक्रम सुरू झाला. ‘इंद्रायणी’ व ‘सुख कळले’ या मालिकांनंतर डॉ. निलेश साबळे यांचा ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आला. या दोन नव्या मालिकांसह सुरू झालेल्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आणखी दोन नव्या मालिकांची घोषणा ‘कलर्स मराठी’ वाहिनीने केली.

अभिनेत्री रश्मी अनपट, अभिनेता अशोक ढगे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अंतरपाट’ आणि अभिनेत्री गायत्री दातार व पायल जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अबीर गुलाल’ या नव्या दोन मालिकांची घोषणा करण्यात आली. अशातच आता ‘अबीर गुलाल’ या नव्या मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो शेअर करत तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा खुलासा नव्या प्रोमोमधून झाला आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा – ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’साठी निघाल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो पाहून किरण राव म्हणाली…

प्रोमोमध्ये सुरुवातीला श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पाहायला मिळत आहे. शिवाय रंकाळा चौपाटी उद्यानाची झलक दिसत आहे. तितक्यात नमस्कार मंडळी म्हणत शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री पायल जाधव रेडिओ जॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यानंतर मालिकेतल्या अभिनेत्याची दमदार एन्ट्री होत आहे. हातात गुलाबाचा गुच्छ घेऊन शुभ्रा भेटायला आलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘बिग बॉस मराठी’ विजेता अक्षय केळकर आहे. अक्षय हा शुभ्राच्या आवाजाचा मोठा चाहता असतो त्यामुळे तो तिला गुलाबाचा गुच्छ घेऊन भेटायला आला असतो. पण त्याची भेट शुभ्रा ऐवजी श्रीशी होते. त्यामुळे श्री आणि शुभ्राच्या आयुष्यातील गुंतलेल्या नशिबांचा गुंफलेला खेळ ‘अबीर गुलाल’ नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

‘अबीर गुलाल’ मालिकेचा जबरदस्त प्रोमोमध्ये अक्षयला पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. इतर कलाकार मंडळींसह चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अक्षय, गायत्री आणि पायलची ‘अबीर गुलाल’ नवी मालिका २७ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दररोज रात्री ८.३० वाजता ‘अबीर गुलाला’ मालिका प्रसारित होणार आहे.

हेही वाचा – आईच्या निधनाच्या ६ महिन्यांनंतर तेजश्री प्रधानने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, ‘पाठिशी आहेस ना…”

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या ८.३० वाजता ‘काव्यांजली’ मालिका सुरू आहे. पण आता ‘काव्यांजली’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्या जागी ‘अबीर गुलाल’ मालिका पाहायला मिळणार आहे.

Story img Loader