‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर नेहमी चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तो चर्चेत असतो. अक्षयने आपल्या अभिनयाबरोबर उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात अक्षयची विनोदी शैलीदेखील पाहायला मिळाली. अशा या हरहुन्नरी अक्षय केळकरने अखेर गर्लफ्रेंड ‘रमा’ला सगळ्यांसमोर आणलं आहे. नुकताच अभिनेत्याने ‘रमा’बरोबर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वापासून अनेकदा अक्षय केळकरकडून गर्लफ्रेंड ‘रमा’विषयी ऐकलं आहे. ‘बिग बॉस’मध्ये त्याने अभिनय क्षेत्रातील संघर्षाच्या काळात ‘रमा’ने कशी साथ दिली याविषयी सांगितलं होतं. “आमची प्रेमकथा फिल्मी” असल्याचं तो म्हणाला होता. ‘बिग बॉस’मध्ये असताना अक्षयला खास ‘रमा’ने पत्र पाठवलं होतं. यावेळी त्याने पुढच्या एक-दोन वर्षांत ‘रमा’ नक्की कोण आहे? याचा खुलासा होईल असं सांगितलं होतं. अखेर यावरचा पडदा उठला आहे.

हेही वाचा – वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”

अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ सगळ्यांसमोर आली आहे. उद्या, २३ डिसेंबरला दोघांच्या नात्याला १० वर्ष पूर्ण होतं आहे. त्यानिमित्ताने अक्षयने एक दिवस आधी ‘रमा’ कोण आहे? याचा खुलासा केला आहे. “तर ही माझी रमा…उद्या आम्हाला १० वर्ष पूर्ण होतायत… म्हटलं एक दिवस आधीच सांगाव…म्हणून… बापरे! फाइनली सांगतोय मी…पण काहीही झालं तरी आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही,” असं कॅप्शन लिहित अक्षयने ‘रमा’बरोबरचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये, अक्षय आणि ‘रमा’ गप्पा मारताना दिसत आहे. त्यानंतर तो ‘रमा’च्या केसात मोगऱ्याचा गजरा माळताना पाहायला मिळत आहे आणि दोघांच्या मागे जसराज जोशीच्या आवाजातील मारवा गाणं ऐकू येत आहे. अक्षयची ‘रमा’ पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

हेही वाचा – Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

‘रमा’चं खरं नाव काय? ती काय करते?

अक्षय केळकरच्या ‘रमा’चं खरं नाव साधना काकतकर असं आहे. ती गायिका, गीतकार आहे. अक्षय केळकर आणि समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ गाण्यांसाठी साधनाने काम केलं होतं. साधनाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकूनच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.

हेही वाचा – लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर

अक्षयने गर्लफ्रेंडचं ‘रमा’ नाव का ठेवलं?

‘महाराष्ट्र टाइम्स’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अक्षयने सांगितलं होतं की, त्याला रमा-माधव ही जोडी खूप भावते. त्यामुळे त्याला ‘रमा’ नाव खूप आवडतं. म्हणून तो गर्लफ्रेंडला सुरुवातीपासून ‘रमा’ नावाने बोलावतो. त्याच्या फोनमध्ये साधनाचा नंबर ‘रमा’ नावाने सेव्ह केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 4 winner akshay kelkar revealed girlfriend rama face pps