अभिनेता अक्षय केळकर हा सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता म्हणून त्याला ओळखले जाते. अक्षय हा उत्तम अभिनेता असण्याबरोबरच त्याच्या चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. तो उत्तम चित्रकारही आहे. नुकतंच त्याने गणपती बाप्पाचं एक सुंदर चित्र रेखाटलं आहे. त्यावर एका चाहतीने केलेल्या कमेंटला त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.

अक्षय केळकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो स्वत: गणपतीचं एक सुंदर चित्र रेखाटत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी चित्र काढताना तो त्याच्या पँटवर काळ्या रंगाचा पेंटींग ब्रश फिरवताना दिसत आहे. त्यामुळे त्याची पँट खराब झाली आहे.
आणखी वाचा : “आता मात्र मी तिथे नसेन…”, अक्षय केळकरच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण, म्हणाला “माझ्या हातून इतकी वर्ष…”

त्यावर एका चाहतीने कमेंट केली आहे. “आता आई तुला मारणार, कारण तू पँट खराब केली म्हणून…बाकी मस्त”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. त्यावर अक्षय केळकरने प्रतिक्रिया दिली आहे.

“मला ही कमेंट खरोखरच आवडली आहे. माझी ही पँट मीच धुवणार आहे. असो…”, असे अक्षय केळकरने म्हटले आहे. त्यावर त्या चाहतीने हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

akshay kelkar
अक्षय केळकरची कमेंट

आणखी वाचा : “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

दरम्यान अक्षय केळकरने शेअर केलेल्या या पोस्टला कॅप्शनही दिले आहे. “आयुष्यात बाप्पाने मला खूप काही दिलं… सुरुवातीला, लहानपणी, चित्र म्हंटलं की मी कायम बाप्पाचं चित्र काढायचो…. after lockdown मी पुन्हा चित्रं काढायला सुरवात केली…माझ्या सगळ्या आवडत्या देवांची मी चित्र काढली आणि बाकीही बऱ्याच concept ची सतत चित्र काढली होतीच… पण जो मला लहानपणापासून सगळं काही देत आला, मोठं झाल्यावर मी त्याचं चित्र काढलंच नाही… आणि आज हे पूर्ण केलंय! आणि पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय…

बाप्पाच्या पोटा पेक्षाही खूप मोठा… कारण… माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट घडणारे… आणि ती ही त्यानेच दिलीय… आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणारे जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय… पण आता मात्र मी तिथे नसेन… बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील… ते माझं होतं… कदाचित या साठी माझ्या हातून इतकी वर्ष तुला घडायचं नव्हतं का रे ??? तू मला आता जे काही दिलंयस ना ते खूप आहे…. काळजी घे तुझी … आणि आता तू जिथे असणार आहेस तिथल्या लोकांची आणि माझीही आणि माझ्या लोकांचीही..तुझा अक्षय”, असे अक्षय केळकरने यात म्हटले होते.

Story img Loader