‘कलर्स मराठी’वरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात आलेल्या लावणी नृत्यांगना प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री क्रांती रेडकर, सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक अभिजित पानसे आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. तर यंदा सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाविजेता अभिनेता अक्षय केळकर सांभाळत आहे. नुकताच अक्षयनं त्यांच्या सूत्रसंचालनचा अनुभव सांगितला. तसेच सुरुवातीला ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्याला काय वाटलं होतं? याविषयी तो बोलला आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला चाहत्यांकडून पाहिजेत ‘हे’ गिफ्ट्स; म्हणाली, “मुंबईत एक घर अन्…”

Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या निमित्तानं ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी अक्षय केळकरनं संवाद साधला. तेव्हा त्याला विचारलं की, “ज्यावेळेस तुला पहिल्यांदा विचारलं गेलं की, तू या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करशील का? त्यावेळेस डोक्यात काय हळूहळू विचार सुरू झाले? कारण पहिल्यांदाच सूत्रसंचालन करतोयस.’ यावर अक्षय म्हणाला की, “माझ्या डोक्यात भीतीदायक विचार सुरू झाले होते. कारण ढोलकीच्या तालावर हा मंच दिग्गजांची सूत्रसंचालन करून गाजवला आहे. तिकडे आता नवीन कलाकार येणार आहे, त्याची स्टाईल वेगळी आहे, त्याचा प्रेजेन्स वेगळा आहे. त्याची उभी राहण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. तर पुन्हा एकदा ट्रोलर्सना वाव देतोय की काय असा माझ्या मनात संभ्रम होता. पण मला सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत, त्यांनी माझी स्टाईल स्वीकारली. ती त्यांना खूप जास्त आवडली. मला इंडस्ट्रीमधूनही खूप प्रतिक्रिया येतात, ज्या खूप सकारात्मक असतात. तुझं सूत्रसंचालन खूप चांगलं होतंय, आम्हाला हसायला येतेय. तुझी जी स्टाईल आहे, ती एका लावणीच्या मंचावर गंमत वाटतेय.”

हेही वाचा – निळी साडी, डीपनेक ब्लाऊज अन्… प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले, “गुडघा दुखतोय का?”

पुढे अक्षयनं एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “मला एकाने मेसेज केला होता. जेव्हा कार्यक्रमाचा प्रोमो आला होता, तेव्हा तुझी स्टाईल आणि तुझं बोलणं या मंचाला कदाचित शोभणार नाही, असं त्यामध्ये लिहिलं होतं. आता त्याच व्यक्तीनं भलामोठा कौतुकास्पद मेसेज केला आहे. अक्षय तुला आता पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी द्यायची आहे, तू इतकं भारी सूत्रसंचालन करतोय, कधी भेटू या. माझ्याबाबतीत लोकांचं मत परिवर्तन झालंय हे बघून खूप भारी वाटतंय”

हेही वाचा – जेव्हा तुझी मंगळागौर होईल, तेव्हा? ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…

दरम्यान, अक्षयच्या केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं बिग बॉस मराठीत येण्यापूर्वी काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांची ‘दोन कटिंग’ ही वेब फिल्म प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

Story img Loader