Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. घरातील सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांच्या भेटीस येत आहेत. पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा आहे. त्यामुळे सध्या सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी भेटून ‘बिग बॉस’ खेळण्याचं आणखी बळ देत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फॅमिली वीकमध्ये ‘बिग बॉस’ मधेमधे सदस्यांना फ्रिझ करताना दिसत आहेत. यावेळी काही सदस्य फ्रिझ झालेल्या सदस्यांची मजा घेताना पाहायला मिळत आहेत. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे; ज्यामध्ये ‘बिग बॉस’ने अभिजीतला जेवतानाच फ्रिझ केलं आणि त्यानंतर काय घडलं आहे? जाणून घ्या…
या प्रोमोध्ये, ‘बिग बॉस’ अभिजीतला जेवताना फ्रिज करतात. त्यानंतर निक्की लगेच बघायला जाते आणि म्हणते, “अभिजीतला का बरं फ्रिझ केलं आहे?…याच तोंड चालूच असतं. बघा हसतोय.” त्यानंतर ‘बिग बॉस’ म्हणतात, “निक्की एवढी आपल्याला काळजी वाटते, तर तुम्ही त्यांना भरवू शकता.” तेव्हा निक्की हसत म्हणते, “नको बिग बॉस.” त्यावर पंढरीनाथ म्हणाला, “तिला खरंच जर वाटतं असेल तर भरवेल.” हे ऐकून निक्की म्हणते, “काय म्हणालात?” तर पंढरीनाथ म्हणाला, “मी म्हटलं तिने भरवलं पाहिजे एवढी काळजी वाटतं असेल तर…” यावर निक्की म्हणते की, त्याचे हात आहेत. तो रिलीज केल्यानंतर खाईल. अख्खा सीझन त्याला भरवत आले आहेत.”
पुढे ‘बिग बॉस’ म्हणतात, “भरवत नाहीयेत म्हणून अभिजीत रिलीज.” त्यानंतर अभिजीत ‘बिग बॉस’चे आभार मानत म्हणतो, “थँक्यू बिग बॉस. नशीब नाही भरवलंय.” त्यावर निक्की म्हणाली, “तेवढं डोकं मला आहे.” अभिजीत म्हणाला, “वाचलो मी. मला तुझी काळजी कळली.” तेव्हा निक्की म्हणाली, “तू मला दोन्ही बाजूने टोमणे मारतोय.”
दरम्यान, सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा नववा आठवडा सुरू आहे. यानंतर अंतिम आठवडा असणार आहे. ६ ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता कोण असणार याची धाकधूक प्रेक्षकांमध्ये आहे.