Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा होणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण या सात सदस्यांपैकी एक जण विजयी होणार आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाकडे आहे.
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच इतिहासात न घडलेली गोष्ट होताना दिसत आहे. ते म्हणजे घरात असलेल्या सदस्यांना त्याचा प्रवास घराबाहेर प्रेक्षकांमध्ये दाखवला जात आहे. यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात खास शिव ठाकरेची एन्ट्री झाली आहे. आतापर्यंत निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर आणि अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर यांचा आजवरचा प्रवास दाखवला आहे. हा प्रवास पाहून हे सदस्य भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. अशातच निक्की आणि अभिजीतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केलं आहे.
हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म
या व्हिडीओमध्ये अभिजीत आणि निक्की आतापर्यंतचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास पाहिल्यानंतर गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी निक्की म्हणते, “माझं वन लायनर टाकलेलं आहे, जिथे लॉयल्टी असेल तिथे निक्की तांबोळी असेल. हे का टाकलं? कारण मी लॉयल होती. माझ्या ग्रुपसाठी, घनःश्यामसाठी. जान्हवीसाठी आणि सगळ्यांसाठी लॉयल होती.” त्यावर अभिजीत म्हणाला, “माझं पण असंच आहे. मित्रांसाठी नेहमी उभा राहिलो.” तेव्हा निक्की म्हणाली की, हेच मित्र माझ्या मागे गँगअप करून बोलायचे हे चक्रव्हूमध्ये दाखवलं आहे. त्यात ती अंकिता, डीपी गँगअप करून बोलायचे सी ग्रुप काढला पाहिजे. विचार कर तू…आपल्या दोघांविरोधात अख्खं घर होतं. फक्त दिखाव्यासाठी ग्रुप होता.
पुढे अभिजीत म्हणाला, “हो, त्यांना ते कधीच आवडलं नाही.” त्यानंतर निक्की म्हणाली, “आपली नावं मोठी आहेत. त्यामुळे आपला वापर झालाय. पण ते आपल्याला समजलं नाही.” तेव्हा अभिजीत म्हणाला, “ए आणि बी टीममध्ये सारखं आहे.” त्यावर निक्कीने लगेच होकार दिला.
दरम्यान, अभिजीत आणि निक्कीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “दुसरं कोणी प्रशंसा करत नाही तर स्वतःचं आपली प्रशंसा करायची…अलग लेवल का नशा है.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे दोघं एक नंबरचे नालायक आहेत… माकड आणि मदारी… घरातली खरी माणसं सूरज आणि अंकिता आहे.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, हे बदक म्हणतंय यांची नावं मोठी आहेत. जनतेने यांना बाहेर पडल्यावर यांची लायकी दाखवा.
© IE Online Media Services (P) Ltd