Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आठवा आठवडा दणक्यात सुरू झाला आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हा नॉमिनेश टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर या टीमला अपयश मिळालं. त्यामुळे हे पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. सध्या बीबी करन्सीचा टास्क सुरू आहे. याच टास्कदरम्यान अभिजीत सावंतने गडबड केल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीबी करन्सीच्या टास्कमध्ये आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. ‘बिग बॉस’ने केलेल्या जोड्यांनुसार हा टास्क खेळला जात आहे. या जोडीमधील एका सदस्याला दिलेल्या पक्षी, प्राण्यांच्या अभिनय करायचा असून दुसऱ्या सदस्याला ते ओळखायचं आहे. दुसऱ्या सदस्याने ते ओळखल्यानंतर अ‍ॅक्टिव्हिटी रूममध्ये ठेवलेल्या त्या पक्षी, प्राण्याचं चित्र गार्डनमध्ये आणायचं आहे. त्यानंतरच पहिल्या सदस्याने टाकीचं पाणी बंद करायचं आहे. पहिल्या फेरीत पंढरीनाथ-संग्राम ही जोडी गेली. दोघांनी सर्व पक्षी, प्राणी अचूक ओळखून २० हजार बीबी करन्सी मिळवली. त्यानंतर धनंजय-वर्षा यांनी ३० हजार बीबी करन्सी जिंकली. तिसरी फेरी ही रंजक ठरली. या फेरीत अरबाज-जान्हवी टास्क खेळायला गेले होते. एका पक्षामुळे अरबाज-जान्हवीला या फेरीत बीबी करन्सी मिळवता आली नाही.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?

आजच्या ( १८ सप्टेंबर ) भागात उर्वरित जोड्या खेळताना दिसणार आहेत. यामध्ये निक्की-अभिजीत आणि अंकिता-सूरज असणार आहे. पण अभिजीत सावंतने या टास्कमध्ये गडबड केली आहे. यावरून घरातील सदस्यांसह ‘बिग बॉस’ने देखील त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. याचा व्हिडीओ ‘टीआरपी मराठी’ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये, टास्कमध्ये गडबड करून आलेल्या अभिजीतला धनंजय म्हणतो, “मला फक्त एकाच प्रश्नाच उत्तर दे, हत्ती आणि गेंडा तू पट्या पट्याचा केव्हा बघितला आहेस?” त्यानंतर निक्की हसत-हसत धनंजय जवळ जाऊ सांगते, “अरे हा ( अभिजीत ) विचारतो प्राणी व्हेज आहे की नॉनव्हेज…बावळट…तू किती वेळ घालवला?…व्हेज, नॉनव्हेज कुठून आलं?”

पुढे धनंजय अभिजीत सावंतला म्हणाला, “तुला सांगताना तिने काळा रंग दाखवला, पांढरा बोर्ड दाखवला. पट्टे पट्टे दाखवले. तर काळा, पांढरा इमॅजिन कर ना.” त्यानंतर निक्की म्हणाली, “शेवटी मी कन्फूज झाले होते. काटे काटे कसे दाखवू?” मग ‘बिग बॉस’ अभिजीतची फिरकी घेत विचारतात, “अभिजीत एक प्रश्न पडलाय…आपण व्हेज आहात की नॉनव्हेज.” यानंतर घरात एकच हशा पिकतो.

हेही वाचा – Bigg Boss Marathi: सूरज चव्हाणला पाण गेंडा ओळखताना आले नाकीनऊ; सर्व सदस्यांना झालं हसू अनावर, पाहा व्हिडीओ

दरम्यान, आता निक्की आणि अभिजीत सावंत अचूक पक्षी, प्राणी ओळखून किती बीबी करन्सी जिंकतायत? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तसंच घरातील सर्व सदस्य एकूण किती बीबी करन्सी जिंकणार आणि किती वेळासाठी गॅसचं कनेक्शन मिळवणार? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 abhijeet sawant made a mess in bb currency task pps