Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ ऑक्टोबरला यंदाचं ‘बिग बॉस मराठी’ संपणार आहे. अवघे ११ दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता स्पर्धकांमध्ये चुरसीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आता आपल्या ग्रुपविरोधात खेळताना दिसत आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा नववा आठवडा सुरू आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे आठ स्पर्धक बाकी राहिले आहेत. या आठवड्यात या आठही स्पर्धकांना बिग बॉसने नॉमिनेट केलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात सध्या लगोरीचा टास्क सुरू आहे. या टास्कमध्ये निक्कीची टीम जिंकल्याचं समोर आलं आहे. कारण नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये निक्की, धनंजय, वर्षा आणि सूरज हे मालक झाल्याचं दिसत असून ते अभिजीत, अंकिता, जान्हवी आणि पंढरीनाथ यांच्याकडून त्यांची वैयक्तिक काम करून घेताना दिसत आहेत. अशातच अभिजीत सावंतच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ

हेही वाचा – Bigg Boss 18 : सलमान खानच्या बहुचर्चित ‘बिग बॉस’साठी सहा स्पर्धकांवर शिक्कामोर्तब, ‘हा’ मराठी चेहरा झळकणार

‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर नुकताच अभिजीत सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धनंजय अरबाज, अंकिता जान्हवी आणि अभिजीत निक्कीची नक्कल करत आहे. यावेळी अभिजीत निक्कीची जबरदस्त नक्कल करताना दिसत आहे; जे पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे. एका लग्नात अरबाज, जान्हवी आणि निक्की भेटले आहेत. यावेळी जान्हवी अरबाजला निक्की विरोधात भडकवतं असते. त्याचवेळी निक्कीची जान्हवी आणि अरबाजवर रिअ‍ॅक्शन काय असणार आहे, हे अभिजीत करताना दिसत आहे. धनंजय मालक झाल्यामुळे त्याने अभिजीतला व अंकिता हा ड्रामा करायला सांगितला आहे, असं अभिजीत निक्कीला शेवटी सांगताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या…”, चित्रपट ‘ऑस्कर’ला गेल्यावर छाया कदम यांची पोस्ट

नेटकरी काय म्हणाले?

दरम्यान, अभिजीत सावंतचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू येत असलं तरी काही जणांनी यांना निक्की शिवाय काही दिसत नाही असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरे बाबांनो अरबाज गेला. किती दिवस निक्की-अरबाज विषयावर बोलणार. हेच तुमचं चुकतं.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, निक्की पुराण हेच तर वाचत असतात.

Story img Loader