Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात २४ ऑगस्टच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जान्हवीसह अनेकांना चांगलंच झापलं. पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे जान्हवीला थेट भाऊच्या धक्क्यावरून हकलवून लावलं. तिला जेलमध्ये टाकलं. त्यानंतर रितेशने निक्कीला देखील चांगलीच ताकीद दिली. जान्हवीनंतर जेलमध्ये जाण्यासाठी तुझा नंबर लागू शकतो, असं थेट रितेश म्हणाला. याशिवाय रितेशने अभिजीत सावंतना देखील सुनावलं. आजच्या ( २५ ऑगस्ट) भाऊच्या धक्क्यावर खास पाहुणे येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इमर्जन्सी’ चित्रपटानिमित्ताने अभिनेत्री, खासदार कंगना रणौत आणि श्रेयश तळपदे आज भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावणार आहेत. याशिवाय २६ ऑगस्टपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘दुर्गा’ नवीन मालिका सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने मालिकेतील अभिनेत्री रुमानी खरे, अभिनेत्री अंबर गणपुळे आणि शिल्पा नवलकर ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात जाणार आहेत. यावेळी हे कलाकार सदस्यांबरोबर रॅपिड फायर खेळ खेळणार आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आला. ज्यामध्ये अभिजीत सावंत रॅपिड फायरच्या खेळात जबरदस्त उत्तरं देताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘गोविंदा आला रे’ कार्यक्रमात एजे आणि लीलाचा ‘या’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “एकदम झकास…”

अभिजीतला रुमानी पहिला प्रश्न विचारते की, टीम ‘बी’ मधल्या एका सदस्याला काढून टीम ‘ए’ मधला एक सदस्य आपल्यात घ्यायचा झाला, तर कोणाला काढाला आणि कोणाला घ्याल? यावर अभिजीत म्हणाला, “मी आर्याला काढून इरिनाला घेईन.” त्यानंतर त्याला दुसरा प्रश्न विचारला, “आता या क्षणाला तुम्हाला सर्वात जास्त कोणाची आठवण येते?” तेव्हा गायक म्हणाला, “सर्वात जास्त घराची आठवण येते.” यावर अंकिता म्हणाली, “त्याने सगळ्यांना एकत्रच घेतलं.”

Bigg Boss Marathi Season 5 ( Photo Credit – Colors Marathi )

अभिजीत सावंतच्या मते बेस्ट कॅप्टन कोण?

अभिनेत्रीने तिसरा प्रश्न विचारला की, “दोघींपैकी बेस्ट कॅप्टन तुमच्या मते कोण आहे?” अभिजीत म्हणाला, “अंकिता” यावर अंकिता हसत म्हणाली, “घाबरला नाहीस ना?” त्यानंतर चौथा प्रश्न विचारला की, या घरातील कोणते तीन सदस्य तुम्हाला टॉप-३मध्ये पोहोचतील असं वाटतंय? अभिजीत म्हणाला, “अंकिता, निक्की आणि अरबाज.”

हेही वाचा – कंगना रणौत यांना ‘संजू’ चित्रपटात काम करण्याची मिळाली होती संधी; म्हणाल्या, “रणबीर कपूर स्वतः माझ्या घरी आला अन्…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्यात आर्या जाधव, इरिना, अभिजीत सावंत आणि वैभव चव्हाण हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या चार स्पर्धकांपैकी कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 abhijeet sawant wants to drop arya from b team and take irina from a team pps