Bigg Boss Marathi Season 5 : नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला. या कॅप्टन्सी टास्कमध्ये ‘ए टीम’मध्ये अरबाज, धनंजय, वर्षा, सूरज होते. तर ‘बी टीम’मध्ये अभिजीत, अंकिता, संग्राम, जान्हवी आणि पंढरीनाथ होते. या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सदस्यांना दुसऱ्या सदस्याच्या घरट्यात अंड ठेऊन त्या सदस्याला कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद करायचं होतं. ‘ए टीम’ने ‘बी टीम’मध्ये असलेल्या सगळ्या सदस्यांच्या घरट्यात अंडी ठेऊन सर्वांना कॅप्टन्सीच्या टास्कमधून बाहेर केलं. त्यामुळे आता अरबाज, धनंजय, सूरज आणि वर्षा उसगांवकर यांच्यामधील कोण आठव्या आठवड्याचा कॅप्टन होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच अभिजीत सावंतचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टीआरपी मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर अभिजीत सावंतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता अभिजीतच्या चेहऱ्यावर मेकअप करताना दिसत आहे. तर जान्हवी त्याला साडी नेसवताना पाहायला मिळत आहे. यावेळी अरबाज अभिजीतला बघून म्हणतो, “ओ छमक्क छल्लो…” त्यानंतर निक्की देखील दाखव म्हणत पुढे येते आणि म्हणते, “बाईईईई…” अरबाज आणि निक्की दोघं अभिजीतकडे बघून खूप हसू लागतात.

हेही वाचा – …म्हणून सीमा देव यांनी अभिनय करणं सोडलं होतं, सूनबाई स्मिता देव यांनी सांगितलं कारण

त्यानंतर निक्की अभिजीतसाठी खोटे केस घेऊन येते. अभिजीतचे केस बांधून त्याला खोटे केस लावताना दिसत आहे. तेव्हा अभिजीत म्हणतो, “हे काय दिवस आले. पोरं म्हणतील, हे बापाचं काय झालंय?” मग सर्व सदस्य हसू लागतात. तितक्यात अरबाज म्हणतो, “सूरजसाठी एक मुलगी पाहिजे होती आणि तुम्ही खरंच आणलात.” सूरज म्हणतो, “गप्प…पण कसली दिसतेस गं”. असं अभिजीकडे बघून सूरज म्हणतो. त्यानंतर पदर नीट करून अभिजीत साडीत चालताना पाहायला मिळत आहे. अभिजीतचा हा भन्नाट लूक पाहून नेटकऱ्यांनी देखील हसायला येतं आहे.

हेही वाचा – सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, या आठवड्यात अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 abhijeet sawant wears a saree watch video pps