Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ‘बिग बॉस’ घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. मानकाप्यापासून बचाव करण्यासाठी सगळ्या सदस्यांच्या जोड्या करण्यात आल्या आहे. तसंच आठवडाभर घरात एकट्याने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. अभिजीत-निक्की, अरबाज पटेल – आर्या जाधव, जान्हवी किल्लेकर – सूरज चव्हाण, वैभव चव्हाण – धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे – छोटा पुढारी घन:श्याम, वर्षा उसगांवकर – अंकिता वालावलकर अशाप्रकारे जोड्या पुढील आठवडाभर पाहायला मिळणार आहेत. अशातच नॉमिनेश टास्क देखील सुरू झाला आहे. पाचव्या आठवड्यात आता कोण-कोण नॉमिनेट होतंय? हे आजच्या भागात स्पष्ट होईल.

दुसऱ्या बाजूला मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी ‘बिग बॉस’मध्ये दररोज घडणाऱ्या गोष्टीबद्दल आपलं परखड मत व्यक्त करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे जान्हवी किल्लेकर विरोधात अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. पण असं असलं तरी सोशल मीडियावर सध्या एका सदस्याचा खूप बोलबाला आहे तो म्हणजे सुरज चव्हाण. ‘बिग बॉस’ सुरू झाल्यामुळे सुरजला अख्ख्या महाराष्ट्रातून चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. कलाकार मंडळी देखील त्याचं कौतुक करत आहेत. एवढंच नाहीतर ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण असेल असं म्हणत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरने काही दिवसांपूर्वी सुरज चव्हाणसाठी खास पोस्ट शेअर केली होती. “सच्चा माणूस” असं लिहित त्याने सुरजचं कौतुक केलं होतं. आता पुन्हा एकदा अक्षय सुरजचं भरभरून कौतुक करताना पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: “गोविंदा रे गोपाळा…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लोकप्रिय गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

अक्षय केळकर सुरज विषयी काय म्हणाला?

नुकताच अक्षय केळकरने ‘अल्ट्रा मराठी बझ’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. तेव्हा अक्षय म्हणाला, “मी आतापर्यंत कुठल्याही स्पर्धकाबद्दल सोशल मीडियावर काहीच लिहिलं नाहीये किंवा ट्रोल केलं नाही. कारण मला माहितीये २४ तास तिथे राहिल्यानंतर काय होतं किंवा काय नाही होतं. आज पहिल्यांदाच या माध्यमातून स्पर्धकांबद्दल बोलतोय.” ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा – “मी खूप कृतज्ञ आहे…”, नव्या मालिकेविषयी सांगताना मृणाल दुसानिसचं वक्तव्य, म्हणाली, “मालिकेचं नाव…”

पुढे अक्षय म्हणाला, “सूरज एक असं व्यक्तिमत्त्व आहे जे गावाकडून आलंय. तो मातीतला खरेपणा हा फक्त शब्दापुरती नाहीये. तर त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे. जेव्हा मी बिग बॉसच्या घरात गेलो होतो आम्ही तेव्हा तो एकदम शांत होता. तो बऱ्याचदा शांत दिसतो पण जेव्हा केव्हा त्याला खेळायचं असत ना भाई तेव्हा तो काही पेटून उठतो. तेव्हा आपसूक टाळ्या वाजतात. मला तो सच्चेपणा, तो खरेपणा, मला प्रचंड आवडला. त्याने त्याच्या घरच्यांविषयी सांगितलं. तिथे सुद्धा त्याने इतकं खऱ्या रितीने सांगितलं त्यामुळे ते जास्त भिडलं. त्याचा भावनांशी मी कनेक्ट झालो. त्याने खेळाडू म्हणून जे काही फ्रेंज फाइजच्या खेळात टक्कर दिली भाई तिथे मी एक स्पर्धक म्हणून पण कनेक्ट झालो. त्यामुळे मी टाकलं सच्चा माणूस.”

Story img Loader